युझर्स - पुणे पोलिसांत LSD ड्रग्जवरुन रंगली मिश्किल जुगलबंदी

चरस गांजा म्यांव, म्यांव... २०२० मध्ये हे सर्व नको भाऊ!!

Updated: Jan 1, 2020, 04:11 PM IST
युझर्स - पुणे पोलिसांत LSD ड्रग्जवरुन रंगली मिश्किल जुगलबंदी  title=

पुणे : ३१ डिसेंबरला 'ड्रग्जपासून दूर राहा' ही ताकीद देताना पुणे पोलिसांनी एका हटके ट्विट केलं. या ट्विटला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळतोय. मुख्य म्हणजे, या ट्विटनंतर युजर्सनी पुणे पोलिसांची फिरकी घेण्याचा प्रयत्न केला खरा मात्र पुणे पोलिसांनी दिलेल्या इशारेवजा मिश्किल उत्तरांनी हा 'संवाद' अधिकच रंगला.

चरस गांजा म्यांव, म्यांव...

२०२० मध्ये हे सर्व नको भाऊ!!

असं ट्विट ३१ डिसेंबरला पुणे पोलिसांनी केलं. या ट्विटला रिप्लाय करत एका युजरने थेट पोलिसांनांच 'Guys, एलएसडीला परवानगी आहे का?' असं विचारण्याचं धाडस केलं

त्यावर पुणे पोलिसांच उत्तर होतं... 'ते कुठं शोधायचं?'

एका ट्विटवरुन पुणे पोलिसांची अनेक जण फिरकी घेतायत हे पाहून 'पुणे पोलिसां'च्या मदतीला धावून येत या संवादात 'महाराष्ट्र' पोलिसांनीही उडी घेतली.


सौ. सोशल मीडिया 

‘आमची महाराष्ट्रात कुठेही पिक-अपची व्यवस्था आहे' (We could arrange the ‘pick up’ anywhere in the state!) असं महाराष्ट्र पोलीस ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केलं. 

आता यावर दुसऱ्या एका युजरने 'मी पण एलएसडी गोळा करायला तुमच्यासोबत येऊ शकतो का?' असा प्रश्न केला.

पुढे पोलिसांनी त्यानंतर दिलेलं उत्तरही तेवढंच भारी होतं. 'तुम्ही येऊ शकाल पण कदाचित त्यानंतर तुम्हाला कदाचित आमच्यासोबतच राहावं लागेल'


सौ. सोशल मीडिया 

अर्थात आता तर कहरच होता... 'एक युजर्सने विचारलं जर मी तुम्हाला अड्डा सांगितला तर त्यातल्या १० पुड्या माझ्या... चालेल ना सर?'

'तुम्ही सर्व पुड्या ठेवा. आम्ही बस तुम्हालाच ठेऊन घेऊ, चालेल ना सर?' या पुणे पोलिसांच्या उत्तराला मात्र सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळतोय.


सौ. ट्विटर

पुणे पोलिसांनी काल केलेल्या या ट्विटच्या लाईक, रिट्विट आणि कमेंटचा विचार केला तर आत्तापर्यंत जवळपास लाखभर युजर्सनी या ट्विटला प्रतिसाद दिलाय. पुणे पोलिसांनीही आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा संवाद टॉपवर ठेवलाय.

अनोखे ट्विट करुन जनजागृती करण्याचा प्रयत्न पोलीस कायमच प्रयत्न करत असतात. युजर्स आणि पुणे पोलिसांमधला हा संवाद कुणाला २०१९ चा सर्वात भावलेला संवाद वाटला तर कुणाला पोलिसांना १०० तोफांची सलामी द्यावीशी वाटली. पण सोशल मीडियावर पोलिसांचं हे रुप प्रत्यक्ष पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर अनुभवायला मिळायला हवं.