कुटुंबासोबत त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी निघाला पण चालत्या एसटीमध्येच...पुण्यात मन हेलावणारी घटना

Pune Death In ST:  भोसरी येथून प्रवाशी ज्ञानदेव शिवाजी जाधव आपल्या परिवारासोबत निघाले. त्यांच्यासोबत पत्नी मीना ज्ञानदेव जाधव, मुलगा मयूर ज्ञानदेव जाधव हे होते. सर्वांनी मिळून त्र्यंबकेश्वर येथे देवदर्शन घ्यायचा त्यांचा प्लान होता.

Pravin Dabholkar | Updated: Sep 6, 2023, 09:03 AM IST
कुटुंबासोबत त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी निघाला पण चालत्या एसटीमध्येच...पुण्यात मन हेलावणारी घटना title=

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे: त्र्यंबकेश्वरचे दर्शन घ्यायची त्याची खूप इच्छा होती. ही इच्छा लवकरच पूर्ण होती. या आनंदात तो होता. त्याने आपल्या आनंदात कुटुंबीयांनाही सहभागी करुन घेतले होते. संपूर्ण तयारी झाली. एसटी बस त्र्यंबकेश्वरच्या दिशेने निघाली. पण नियतीला काहीतरी वेगळेच मंजूर होते. त्याचे त्र्यंबकेश्वर दर्शन पूर्ण होण्याआधीच काळाने त्याच्यावर घाला घातला. पुणे जिल्ह्यातून एक मन हेलावणारी घटना समोर आली आहे. काय आहे ही घटना? सविस्तर जाणून घेऊया.  

आंबेगाव तालुक्यातील मंचर परिसरात धक्कादायक घटना घडली. पुण्याहून पिंपळगाव बसवंतकडे निघालेल्या चालत्याबसमध्ये एका प्रवाशाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. यात एका इसमाचा दुर्देवी मृत्यू झाला. मृत व्यक्ती ही आपल्या कुटुंबासमवेत भोसरी येथून कुटुंबासमवेत त्र्यंबकेश्वर येथे निघाली होते.मात्र महादेवाचे दर्शन त्यांचे अपूर्णच राहिले. या घटनेने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. ज्ञानदेव शिवाजी जाधव असे मृत व्यक्तीचे नाव असून ते 58 वर्षांचे होते.

ज्ञानेश्वर जाधव हे सद्या भोसरी येथे राहत होते मात्र त्यांचे मूळ गाव उमरगा आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास ही घटना समोर आली. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत एसटी आगाराची बस क्रमांक एम एच 40 वाय 5654 ही एसटी बस पुणे ( वाकडेवाडी ) येथून निघाली. ही बस पिंपळगाव बसवंत येथे जाणार होती. त्यात भोसरी येथून प्रवाशी ज्ञानदेव शिवाजी जाधव आपल्या परिवारासोबत निघाले. त्यांच्यासोबत पत्नी मीना ज्ञानदेव जाधव, मुलगा मयूर ज्ञानदेव जाधव हे होते. सर्वांनी मिळून त्र्यंबकेश्वर येथे देवदर्शन घ्यायचा त्यांचा प्लान होता.

एसटीने राजगुरुनगर बस स्थानक सोडल्यानंतर पेठ घाटाजवळ मंचरकडे जात असताना प्रवासी ज्ञानदेव शिवाजी जाधव यांना अचानक झटका आला. त्यामुळे ते एकदम अस्वस्थ झाले. त्यामुळे बसमधील प्रवाशांनी आरडाओरडा सुरु केला. त्यावेळी एसटी चालक- वाहकन गाडी थांबवून ज्ञानदेव यांची चौकशी केली. त्यांची पत्नी मीना आणि मुलगा मयूर यांनी वडील ज्ञानदेवांना तातडीने रुग्णालयाची गरज असल्याचे सांगितले. यानंतर एसटी चालकाने मंचर जवळील एका रुग्णालयात उपचारासाठी एसटी थांबवली. 

डॉक्टरांनी ज्ञानदेव यांना उपचारासाठी घेतले. पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. वडील ज्ञानदेव यांना या अगोदर हृदयविकाराचा झटका आला होता, अशी माहिती मुलगा मयूर याने दिली.बहुदा त्यांचे हदयविकाराने निधन झाले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे.