Pune Crime News : प्रेम आंधळं असतं असं अनेकवेळा आपण ऐकलं असेल, अशाच प्रकारच प्रकरण पुण्यात घडलं. तीन वर्षापासून तरूण-तरूणीचे एकमेकांसोबत प्रेमसंबंध होते. मात्र मुलीचं दुसऱ्या तरूणासोबत लग्न ठरल्यावर तरूणाने जे केलं त्याने खळबळ उडाली आहे. साकीब लतीफ इनामदार असं तरूणाचं नाव आहे. (Pune Crime News Sinhagad Fort Golewadi Kinara Lodge)
नक्की काय घडलं?
तीन वर्षांपासून साकीब इनामदारचे एका तरूणीसोबत प्रेमसंबंध होते. काही दिवसांपूर्वी तरूणीचं लग्न ठरतं त्यामुळे साकीब तणावामध्ये होता. रविवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास सिंहगड किल्ल्याच्या (Sinhagad Fort) पायथ्याशी असलेल्या गोळवाडीमधील किनारा लॉजमध्ये गेले.
लॉजमध्ये गेल्यावर रूम घेतात, रूममध्ये साकीब आणि तरूणीचं भांडण होतं. तरूणीचं लग्न ठरलेलं असतं त्यामुळे साकीब दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाचीसुद्धा होते. त्यावेळी तुझे दुसऱ्याशी लग्न जमले आहे मी तरी जगून काय करु? असं साकीब म्हणतो. इतकंच नाहीतर साकीब तरूणीची ओढणी घेतो आणि गळफास घेऊन आपलं जीवन संपवतो.
साकीबला वाचवण्यासाठी तरूणी लॉज मालकाकडे जाते आणि त्याच्याकडून ब्लेड आणते. मात्र तोपर्यंत उशिर झालेला असतो. कारण साकीबचा मृत्यू झालेला असतो. लॉज मालकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवला आहे. पोलीस पुढील प्रकरणाचा तपास करत आहेत.