'आरबीआय' विरोधात जिल्हा बँकेची सर्वोच्च न्यायालयाकडे धाव

ठेवण्यासाठी जागाच नसल्याचं सांगत, सहकारी बँकांकडे नोटाबंदीच्या काळात जमा झालेल्या नोटा बदलून देण्यास रिझर्व बँकेनं नकार दिलाय. याचविरोधात आता एका बँकेनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलीय.

Updated: Feb 23, 2018, 08:44 PM IST
 title=

पुणे : ठेवण्यासाठी जागाच नसल्याचं सांगत, सहकारी बँकांकडे नोटाबंदीच्या काळात जमा झालेल्या नोटा बदलून देण्यास रिझर्व बँकेनं नकार दिलाय. याचविरोधात आता एका बँकेनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलीय.

नोटाबंदीच्या काळात पुणे जिल्हा सहकारी बॅंकेत जमा झालेल्या २२ कोटींच्या जुन्या नोटा बदलून देण्यास रिझर्व बँकेनं नकार दिलाय. यात पुणे जिल्हा बॅंकेची काहीही चूक नसताना बॅंकेला हा नाहक भुर्दंड पडणार असल्याचा दावा, बॅंकेतर्फे करण्यात आला.

आपल्याकडे जमा झालेली रक्कम ठेवण्यासाठी जागा नसल्याचं कारण देत राष्ट्रीयीकृत बॅंकांनी या नोटा स्वीकारायल्या नाहीत, असा दावा पुणे जिल्हा बॅकेनं केलाय.

त्यामुळे रिझर्व बँकेच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.

विशेष म्हणजे, राज्यातील ८ जिल्हा बॅंकांचे सुमारे ११२ कोटी रुपये रिझर्व बॅंकेने बाद ठरवले आहेत.