पुण्यातील देवेन शाह यांच्या मारेकऱ्यांची ओळख पटली

अट्टल गुन्हेगार असून पोलीस त्यांचा शोध घेताहेत. हत्येच्या मुळाशी जागेचा वाद असल्याचा पोलिसांना संशय आहे. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 16, 2018, 02:24 AM IST
पुण्यातील देवेन शाह यांच्या मारेकऱ्यांची ओळख पटली title=

पुणे : पुण्यात देवेन शाह या बिल्डरच्या हत्येचं सीसीटीव्ही फुटेज हाती आलंय. शाह यांच्यावर प्रत्यक्षात गोळ्या चालवल्या जात असतानाची ही दृष्य आहेत. यातल्या हल्लेखोरांची ओळख पटली आहे. रवी चोरगे आणि राहुल शिवतारे अशी त्यांची नावं आहेत. 

दोघेही अट्टल गुन्हेगार

दोघेही अट्टल गुन्हेगार असून पोलीस त्यांचा शोध घेताहेत. हत्येच्या मुळाशी जागेचा वाद असल्याचा पोलिसांना संशय आहे. 

देवेन शाह यांची हत्या

देवेश शाह यांच्या हत्येची या दोघांना कोणी सुपारी दिली होती का, हत्येमागे आणखी कोणी आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. पुण्यातल्या प्रभात रोडवर शनिवारी रात्री गोळीबार करून बिल्डर देवेन शहा यांची हत्या करण्यात आली होती.