शहीद योगेश भदाणे यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

शहीद जवान योगेश भदाणे यांच्यावर पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 16, 2018, 12:46 AM IST
शहीद योगेश भदाणे यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार title=

धुळे : काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात शहीद झालेले धुळे जिल्ह्यातले जवान योगेश भदाणे यांचं पार्थिव खलाणे या त्यांच्या मुळ गावी आणण्यात आला. शहीद जवान योगेश भदाणे यांच्यावर पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

शहिद योगेश यांना अखेरची मानवंदना

शहिद योगेश यांना अखेरची मानवंदना देण्यासाठी हजारोंचा जनसमुदाय आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी शहीद योगेश भदाणे यांच्या आठवणीने मित्र परिवार हळहळला.

पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर

दुसरीकडे लष्कर दिनाचं औचित्य साधत भारतीय सैन्यानं पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलंय. जम्मू काश्मिरच्या पूंछ जिल्ह्यात शस्त्रसंधीचं उल्लंघन करणा-या सात पाकिस्तानी सैनिकांना ठार करण्यात आलं. तर उरीमध्ये घुसखोरी करताना सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं.