पुणे : आईच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मालकावर हल्ला; इन्स्टाग्रामवरुन सापडला आरोपी

Pune Crime : आईच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मुलाने मालकावर कोयत्याने हल्ला केल्याचा प्रकार पुण्याच्या लष्कर भागाता घडला आहे. पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे.

आकाश नेटके | Updated: Dec 4, 2023, 01:47 PM IST
पुणे : आईच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मालकावर हल्ला; इन्स्टाग्रामवरुन सापडला आरोपी title=

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यात (Pune Crime) सराफा व्यावसायिकावर कोयत्याने वार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आईच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी एका तरुणाने सराफा व्यावसायिकावर कोयत्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात व्यावासियक गंभीर जखमी झाला होता. फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी (Pune Police) आरोपीला अटक केली आहे. या घटनेचं धक्कादायक सीसीटीव्ही फुटेजही व्हायरल झालं होतं. आरोपीने सराफा व्यापाऱ्यावर हल्ला करून त्याचा खुनाचा प्रयत्न केल्याची कबुली दिली आहे.

पुण्यातील उच्चभ्रू अशा लष्कर परिसरातील मेहता ज्वेलर्सचे मालक विजय मेहता यांच्यावर कोयत्याने हल्ला करणाऱ्या युवराज घोरके याला पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास लष्कर परिसरातील मेहता ज्वेलर्सजवळ युवराज घोरके याने मेहता यांच्यावर हल्ला केला होता. त्यानंतर पुणे पोलिसांनी इंन्स्टाग्रामवरून आरोपीचा शोध लावला आहे. या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल माध्यमावर व्हायरल होत आहेत. आरोपी युवराजची आई मेहताच्या घरी मोलकरीण म्हणून काम करायची. काही दिवसांपूर्वी मेहताच्या घरी चोरी झाली होती. तेव्हा मेहताने युवराजच्या आईवर संशय घेत पोलीस ठाण्याला नेले होते. त्याच रागातून युवराजने विजय मेहतावर भर रस्त्यात कोयत्याने हल्ला केला होता.

युवराज अनिल गोरखे (वय 24, रा. वैदुवाडी, हडपसर) याच्यासह त्याचा साथीदार सार्थक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय विमलचंद मेहता हे हल्ल्यात जखमी झाले आहेत. याबाबत मेहता यांचा भाऊ मनोज यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. आरोपी गोरखे याच्याविरुद्ध यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल आहेत. योगेशची आई मेहता यांच्याकडे कामाला होती. विजय आणि योगेशची आई यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर विजय मेहता यांनी योगेशच्या आईवर चोरीचा आरोप लावला होता. आईचा अपमान केल्याने घोरखे चिडला आणि त्याने मेहता यांच्यावर कोयत्याने हल्ला केला.

आरोपींनी लष्कर भागातील सेंटर स्ट्रीट परिसरात विजय मेहता यांना अडवलं. घोरखे आणि सार्थकने मेहतावर कोयत्याने हल्ला केला. त्यामुळे विजय यांनी पळ काढला. आरोपींनी त्यांचा पाठलाग करुन पुन्हा त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला.  या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी तपास करुन घोरखेला अटक केली. आईचा अपमान केल्याने त्याने विजय यांच्यावर हल्ला केल्याची कबुली योगेशने दिली.