Pune Crime News : मागील काही दिवसांपासून पुण्यातील (Pune) पीएमपीएमएल चालक (PMPML) आणि कंडक्टर (Bus Conductor) यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सलग तिसऱ्या दिवशी पीएमपीएमएल चालकाच्या मारहाणीची घटना समोर आली. दोन दिवसांपासून बसचालकाला प्रवाशांनी मारहाण केल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा बस चालक आणि तरुणामधील तुंबळ हाणामारीचा व्हिडीओ समोर आला आहे. (Clash Between PMPML Driver And Two Youth In Pune)
रस्त्यावरून जाताना दुचाकी चालकाला हटकल्याच्या रागात बाईकस्वारांनी बस चालकाला मारहाण केली. स्वारगेट डेपोची बस (Swarget Bus Depo) पुणे स्टेशनच्या (Pune Station) दिशेनं जात होती. त्यावेळी दुचाकीस्वार बससमोर आडवे आले. त्यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली. बस चालकाने बाईकचालकाला हटकलं. त्यामुळे तरुणाला बस चालकाने हटकल्याने राग आला.
दोन तरुणांनी बस चालकाशी वाद घातला. हा वाद पेटला आणि तरुणांनी चालकाची कॉलर पकडून चपलांनी हाणामारी (Free Style Fight PMPML Driver) सुरू केली. चालकाने बस थांबवून तरुणाला जोरदार प्रत्युत्तर दिलं आणि दोघांमध्ये हाणामारी सुरू झाली. चालकाला मारताना पाहून बस कंडक्टरनेही मध्यस्थी केली. चालक आणि तरुणामधील तुफान हाणामारी प्रवाशांनी मोबाईल कॅमेऱ्यात शूट (Video Viral) केली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर दोन्ही तरुणांवर गुन्हा दाखल केला असून तरुणांना अटक (Pune Crime News) करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवडमध्येही (Pimpri Chinchwad) चालकाला मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर आता पुणे स्टेशन परिसरात ही घटना घडली आहे.