Police Recruitment : पुणे पोलीस दलातील भरती 'या' कारणामुळे स्थगित

Pune Police Bharti : पुणे पोलीस ( Pune Police) दलातील भरती ( Pune Police Recruitment) स्थगित करण्यात आली आहे.  

Updated: Feb 17, 2023, 01:39 PM IST
Police Recruitment : पुणे पोलीस दलातील भरती 'या' कारणामुळे स्थगित title=
Pune Police Recruitment

Pune Police Bharti : पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी ही महत्वाची बातमी आहे. पुणे पोलीस ( Pune Police) दलातील भरती ( Pune Police Recruitment) स्थगित करण्यात आली आहे. कसबा पेठ आणि पिंपरी-चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या (Pune Bypoll) बंदोबस्तामुळे पोलीस भरती स्थगित करण्यात आली आहे. शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात 3 जानेवारीपासून भरती प्रक्रिया सुरु आहे. मात्र पोटनिवडणुकीमुळे 18 ते 27 फेब्रुवारीदरम्यान भरती स्थगित करण्यात आली आहे. पोलीस मुख्यालयाच्या उपायुक्तांनी ही माहिती दिली आहे. (Maharashtra News in Marathi)

पुणे पोलीस (Pune Police)  दलातील पोलीस भरती येत्या 27 फेब्रुवारीपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. कसबा पोटनिवडणुकीच्या बंदोबस्तामुळे पोलीस भरती प्रक्रिया 18 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत स्थगित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. पुणे पोलीस मुख्यालयाचे उपायुक्त रोहिदास पवार यांनी यासंदर्भातील ही माहिती दिली आहे.

पुणे जिल्ह्यात पोलीस भरती सुरु आहे. 3 जानेवारीपासून पुणे पोलीस दलातील पोलीस शिपाई, चालक पदासाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. मात्र, पोटनिवडणुकीमुळे ही भरती स्थगित केली गेली आहे. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात या भरतीची मैदानी चाचणी सुरु होत्या. या पोलीस भरतीला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात उमेदवार येत आहेत.  

 पुणे जिल्ह्यातील पिंपरी आणि कसबा पेठ या विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीच्या बंदोबस्तामुळे पुण्यातील (Pune News) पोलीस भरती 27 फेब्रुवारीपर्यंत स्थगित करण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली.

पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी 26 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर 2 मार्च 2023 रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. या निवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडी अशी थेट लढत होत आहे.