Uddhav Thackeray Live :ताईंनी थेट पंतप्रधानांना राखी बांधली; जाहीर सभेत थेट भावना गवळींवर निशाणा

ताईंनी आता थेट पंतप्रधांनाना राखी बांधल्याने CBI, ED कुणी या ताईंकडे पाहण्याची देखील हिम्मत करेल का? असे टीकास्त्र उद्धव ठाकरेंनी सोडले.   

Updated: Nov 26, 2022, 05:48 PM IST
Uddhav Thackeray Live :ताईंनी थेट पंतप्रधानांना राखी बांधली; जाहीर सभेत थेट भावना गवळींवर निशाणा

Uddhav Thackeray, बुलडाणा : शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच विदर्भ दौऱ्यावर आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाच्या आमदारांचा रेडे, गद्दार असा उल्लेख करत कडाडून टीका केली. ताईंनी थेट पंतप्रधानांना राखी बांधली अंस म्हणत उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता खासदार भावना गवळी यांच्यावर जोरदार निशाणा साधला.  ताईंनी आता थेट पंतप्रधांनाना राखी बांधल्याने CBI, ED कुणी या ताईंकडे पाहण्याची देखील हिम्मत करेल का? असे टीकास्त्र उद्धव ठाकरेंनी सोडले. खास मुंबईवरुन दलाल पाठवले जायचे त्यांना घाबरवायला. त्यांच्या जवळच्या सर्वांना अटक झाली. यामुळेच ताई थेट त्यांना जाऊन भेटल्या.  

उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाच्या आमदारांचा रेडे असा उल्लेख केला.  काही लोक 40 रेडे घेऊन गुवाहाटीला गेले. हे मी नाही त्यांच्याच मंत्र्याने म्हटलं आहे आमचे 40 रेडे तिकडे गेलेत. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मी एकविरा देवीच्या दर्शना गेलो.  या नंतर अयोध्येला गेलो होतो.

हे कामाख्या देवीच्या दर्शनाला गेलेत. महाराष्ट्रातील देव संपले का?  गेल्या आठवड्यात हात दाखवायला गेले होते. ज्याचं भविष्य त्याला माहीत नाही तो आपलं भविष्य ठरवणार असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेवर निशाणा साधला. तुमचं भविष्य सर्वांना माहीत आहे. यांचे मायबाप दिल्लीत आहेत. यांच भविष्य दिल्लीतून ठरवलं जातयं.हिंदुत्व वाचवण्यासाठी शिवसेना सोडून गेल्याचं ते म्हणातता. पण त्यांची गद्दारी आता समोर आलेय.