Sanjay Raut : आणि रेडे गेले गुवाहाटीला, शिंदे गटाच्या दौऱ्यावर संजय राउत यांची जोरदार टीका

 संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्यावरुन (Guwahati Tour) जोरदार टीका केलीय.   

Updated: Nov 26, 2022, 05:53 PM IST
Sanjay Raut : आणि रेडे गेले गुवाहाटीला, शिंदे गटाच्या दौऱ्यावर संजय राउत यांची जोरदार टीका

मयूर निकम, झी मीडिया, बुलडाणा : " आणि आज रेडे देवीला नवस बोलायले गेलेत, अरे महाराष्ट्रातील (Maharashtra) देव संपलेत का? सर्वात मोठी देवता या बुलडाणा (Buldana) जिल्ह्यात आहेत, राष्ट्रमाता जिजाबाईंचं मंदीर, रेणुकादेवींचं मंदीर आहे", असं म्हणत शिवसेना (Shiv Sena Ubt) ठाकरे गटाते फायरब्रॅंड नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटाच्या (Eknath Shinde Group) गुवाहाटी दौऱ्यावर (Guwahati Tour) जोरदार टीका केली. बुलडाण्यातील चिखलीत शिवसेना ठाकरे गटाच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या दरम्यान संजय राऊत बोलत होते. (shiv sena ubt group leader sanjay raut criticize to eknath shinde group to over to guwahati tour kamakhya temple) 

राज्यात काही महिन्यांपूर्वी मोठी राजकीय उलथापालथ झाली. शिंदे गटाने बंडखोरी करत महाविकास आघाडीचं सरकार पाडलं. तेव्हा गुवाहाटी हे महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्रबिंदू ठरलं होतं. शिंदे गटाने तेव्हा गुवाहाटीतील कामाख्या देवीला नवस केला होता. आता सत्तेत आल्यानंतर शिंदे गट गुवाहाटीत हा नवस फेडण्यासाठी दाखल झाला आहे.  

राऊत काय म्हणाले? 

"सर्वात मोठी देवता या बुलडाणा (Buldana) जिल्ह्यात आहेत, राष्ट्रमाता जिजाबाईंचं मंदीर, रेणुकादेवींचं मंदीर, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी, आणि रेडे गेले गुवाहाटीला.  हा महाराष्ट्र संताचा आहे. शेजारी शेगाव आहे. हा संताचा महाराष्ट्र आहे. आमच्याकडे ज्ञानेशवर महाराजांनी रेड्याकडून वेद वदवून घेतले. आणि मुख्यमंत्री 40 रेड्यांचा बळी देण्यासाठी गुवाहाटीला गेले", असं म्हणत राऊतांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. 

"एकही खोकेवाला निवडून येता कामा नये"

"एकही खोकेवाला निवडून येता कामा नये, अशी आपण शपथ घेतली पाहिजे. अरविंद सांवत यांनी तुरुंगाचा उल्लेख केला. मी शिवसेनेसाठी आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी मी 100 दिवस काय जन्मठेप भोगायला तयार आहे.  एक संजय राऊत कुरबान झाला तर काय झालं", असं म्हणत राऊत यांनी शिवसेनेप्रती असलेलं आपलं प्रेम पुन्हा एकदा बोलून दाखवलं.