पंतप्रधान मोदी पुण्याच्या सिरम इन्स्टिट्युटला देणार भेट

कोरोनावरील लसीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी (Narendra Mod) उद्या पुण्याच्या सिरम इन्स्टिट्युटला भेट देणार आहेत. 

Updated: Nov 27, 2020, 07:37 AM IST
पंतप्रधान मोदी पुण्याच्या सिरम इन्स्टिट्युटला देणार भेट   title=

पुणे : कोरोनावरील (Coronavirus) लसीचा (corona vaccine) आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Mod) उद्या पुण्याच्या सिरम इन्स्टिट्युटला (Punes Serum Institute) भेट देणार आहेत. तर कोरोना लसीकरणाचा सर्व खर्च केंद्र सरकार करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबाबत रॉयटर्स वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला भेट देत असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. लस निर्मिती क्षेत्रातील जगातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या सिरममध्ये सध्या कोरोनावरील लशीची निर्मिती सुरू आहे. त्याचा आढावा पंतप्रधान घेणार आहेत. जिल्हा प्रशासन तसेच सिरमकडून या दौऱ्याची तयारी सुरू आहे. 

देशात लसीकरणाचा सगळा खर्च केंद्र सरकार करण्याची शक्यता आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने ही मोठी बातमी दिली आहे. कोरोना लसीकरणाचा सगळा खर्च उचलण्यासाठी बजेटमध्ये मोठी तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत देशात लसीकरण मोहिमेची सुरूवात होण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, कोरोना लस (corona vaccine) सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी १०० देशांचे राजदूतही ‘सीरम इन्स्टिट्यूट’ला भेट देणार आहेत. राजदूतांचा दौरा २८ नोव्हेंबरला नियोजित करण्यात आला होता. मात्र, पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यामुळे तारखेत बदल करण्यात आला आहे. राजदूत हे चार डिसेंबरला येणार आहेत.‘पंतप्रधान मोदी हे २८ नोव्हेंबरला, तर राजदूत हे चार डिसेंबरला येणार असल्याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली आहे, असे अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी सांगितले.