महात्मा गांधींची काँग्रेस संपली, आता एका कुटुंबाची काँग्रेस - प्रकाश आंबेकर

महात्मा गांधींची सर्वसामान्यांची काँग्रेस आता संपली आहे.

Updated: Feb 21, 2019, 12:51 PM IST
महात्मा गांधींची काँग्रेस संपली, आता एका कुटुंबाची काँग्रेस - प्रकाश आंबेकर title=

बुलडाणा : महात्मा गांधींची सर्वसामान्यांची काँग्रेस आता संपली आहे. आता एका कुटुंबाची काँग्रेस झाली आहे. तेव्हा मुस्लिमांनी आपले मत काँग्रेसला न देता वंचित बहुजन आघाडीला देवून राजकारणातील नवीन इतिहास रचावा असे प्रतिपादन भारीप बहुजन महासंघाचे संस्थापक अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. बुलढाणा येथे मलकापूर रोडवर आयटीआय कॉलेजसमोर वंचित बहुजन आघाडीची सभा झाली. आरएसएसला संविधानाच्या चौकटीत बसवले पाहिजे. ही आमची आग्रही भूमिका असल्याचे विषद करुन आरएसएसशी दोन हात करण्याची काँग्रेसची तयारी असेल तरच युतीचा विचार करु असंही आंबेडकरांनी स्पष्ट केलं आहे.

टकाश्मीरमध्ये शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांना शहीदाचा दर्जा जाहीर केलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी शब्दांचा खेळ करत आहे. कृती कुठेही दिसत नाही. अमेरिकेवर हल्ला झाला त्यांनी लगेच ओसामा बीन लादेनला धडा शिकवला. भारतावर सतत हल्ले होत आहेत. मात्र, आपण बदला घेत नाही. दोष कुठे आहे हे समजायला मार्ग नाही. आज पाकिस्तान भिकारी देश झाला आहे. त्याला कोणताही देश मदत करायला तयार नाही. तुमच्या आणि माझ्या मनात पाकिस्तानबद्दल चीड आहे. परंतु सरकारला युद्ध करायचे असेल तर तज्ज्ञांचे मत घेतले पाहिजे. विचारपूर्वक युद्ध झाले पाहिजे.'

'आपण काय करणार हे लोकांना, विरोधी पक्षाला सांगितले पाहिजे. पायाखालची जमीन सावरण्यासाठी व पक्षाला पुन्हा सत्तेवर येण्यासाठी युद्ध करु नका. सरकार येतील जातील पण युद्धाच्या परिणामांचा विचार केला पाहिजे.' असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. या कार्यक्रमाला असदुद्दीन ओवेसी येणार म्हणून त्यांचे भाषण ऐकण्यासाठी अनेक मुस्लीम बांधव एकत्र आले होते. परंतु ते न आल्यामुळे मुस्लीम बांधवात नाराजीचा सुर होता.