शेतातून २०० क्विंटल डाळिंब चोरीला

राहता तालुक्यातील वाकडी गावातून शेतकऱ्याच्या शेतातून २०० क्विंटल डाळिंब चोरीला गेले आहे.

Updated: Oct 6, 2017, 02:51 PM IST
शेतातून २०० क्विंटल डाळिंब चोरीला title=

शिर्डी : राहता तालुक्यातील वाकडी गावातून शेतकऱ्याच्या शेतातून २०० क्विंटल डाळिंब चोरीला गेले आहे. या डाळिंबाची अंदाजे किंमत ४ ते ५ लाख रूपये आहे. संपतराव लहाने यांच्या शेतात ही चोरी झाली आहे. शेतापासून त्यांचं घर हे हाकेच्या अंतरावर आहे. 

एवढ्या मोठ्या प्रमाणात डाळिंब तोडून, चोरून घेऊन जाण्यास, कुणीतरी जाणकार आणि जवळील व्यक्तीचा सहभाग असावा, असं सांगण्यात येत आहे. डाळिंबाला सध्या योग्य तो भाव मिळत नाहीय, मात्र या शेतकऱ्याला दुसरीकडे चोरट्यांनी देखील धक्का दिला आहे.