छगन भुजबळांना शिवीगाळ करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे निलंबन

माजी मंत्री छगन भुजबळांना शिवीगाळ करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याविरोधात हक्कभंग 

Updated: Jul 18, 2018, 04:28 PM IST
छगन भुजबळांना शिवीगाळ करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे निलंबन title=

नागपूर : मुजोर पोलीस अधिकाऱ्यांविरोधात विधानसभेत सर्वपक्षीय आमदार एकवटले. माजी मंत्री छगन भुजबळांना शिवीगाळ करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याविरोधात हक्कभंग मांडण्यात आला. त्याला सर्वपक्षीय आमदारांनी पाठिंबा देत पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली. 

त्यावर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी श्रीगोंद्याचे पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव यांच्यावर तातडीनं निलंबनाच्या कारवाईचे आदेश दिले. त्यामुळे अशाच इतर मुजोर अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी आमदारांनी केली. यावेळी सर्वपक्षीय आमदारांनी अधिकाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली.