नवी मुंबई विमानतळाच्या भूमिपूजनाची तारीख ठरली

बहुचर्चित आणि मुंबई विमानतळाचा भार कमी करू शकणा-या नवी मुंबई विमानतळाचे भूमिपूजन अखेर १८ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. 

Amit Ingole Amit Ingole | Updated: Feb 7, 2018, 09:29 PM IST
नवी मुंबई विमानतळाच्या भूमिपूजनाची तारीख ठरली title=

नवी मुंबई : बहुचर्चित आणि मुंबई विमानतळाचा भार कमी करू शकणा-या नवी मुंबई विमानतळाचे भूमिपूजन अखेर १८ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. 

कधी होणार कामाला सुरूवात?

सध्या विमानतळच्या मुख्य गाभ्याचे प्राथमिक काम सुरु असून उलवेच्या डोंगरची उंची कमी केली जात आहे, तसंच विमानतळच्या इतर भागाच्या सपाटिकरणाचे काम जोरात सुरु आहे. पुढील ५ - ६ महिन्यात प्रत्यक्ष विमानतळाच्या कामाला सुरुवात होणार आहे. विमानतळ बनवण्याचे काम GVK कंपनीला याआधीच देण्यात आले आहे.

किती हेक्टरमध्ये असणार विमानतळ

हा विमानतळ सुमारे २३०० हेक्टर जागेवर उभारला जाणार असून यांमध्ये २ समांतर धावपट्टया असणार आहेत. या विमानतळचा पहिला टप्पा २०२० पर्यन्त पूर्ण होणे अपेक्षित आहे. नवी मुंबई विमानतळमुळे सध्याच्या मुंबई विमानतळ वरचा मोठा भार हलका होणार आहे.