Narendra Modi, Mumbai-Nagpur Samruddhi Expressway : मुंबई आणि नागपूरला जवळ आणणाऱ्या समृद्धी महामार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) करणार आहेत. ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते नागपूर मेट्रोची सफर करणार आहेत. तसेच समृद्धी महामार्गावरुन प्रवासही करणार आहेत. त्यांच्या दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेय. (PM Narendra Modi to inaugurate Mumbai-Nagpur Samruddhi Expressway)
नव्याने बांधण्यात आलेल्या मुंबई-नागपूर समृद्धी द्रुतगती महामार्गाला (Mumbai-Nagpur Samruddhi Expressway) हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात आले आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे एकूण अंतर 701 किमी आहे. यापैकी नागपूर ते शिर्डी हा 520 किमीचा एक्स्प्रेस वे लोकांसाठी खुला करण्यात येणार असून त्याचे उद्घाटन 11 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. उर्वरित मार्ग सहा महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. या प्रकल्पात किमान 10 जिल्हे प्रत्यक्ष आणि 14 जिल्हे अप्रत्यक्षपणे जोडले जाणार आहेत. 49,250 कोटी रुपये खर्चून बांधलेला 701 किमी लांबीचा एक्स्प्रेस वे 11 जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या 392 गावांमधून जातो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यात फ्रीडम पार्क मेट्रो स्टेशन ते खापरी स्टेशन असा मेट्रो ने प्रवास करणार आहेत. त्यानंतर समृद्धी महामार्गाने सुद्धा दहा किलोमीटरचा प्रवास करणार आहे. नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्ग, मेट्रो फेस 2 यांसह विविध प्रकल्पांच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 डिसेंबरला नागपुरात असतील. सकाळी 9.25 वाजता नागपूर विमानतळावर पोहोचतील. त्यानंतर सुमारे तीन तास दहा मिनिटं ते नागपुरात विविध ठिकाणी कार्यक्रमाना भेटी देणार आहेत. दुपारी 12.35 वाजता ते नागपूरहून गोवाकडे प्रस्थान करतील. (PM Narendra Modi to inaugurate 501 km Samruddhi section on December 11)
सकाळी 9.25 - नागपूर विमानतळ आगमन
सकाळी 9.40-- रस्ते मार्गाने रेल्वे स्थानकावर आगमन
सकाळी 9.45 ते 9.55 --वंदे भारत एक्सप्रेस Flagging off
सकाळी 10.00-- फ्रीडम पार्क मेट्रो स्टेशन येथे आगमन
सकाळी 10.10 -- मेट्रो प्रदर्शनाची पाहणी -आणि मेट्रो सफर
सकाळी 10.20- खापरी मेट्रो स्थानाकावर आगमन
सकाळी10.30-- खापरी मेट्रो स्टेशन. मेट्रोच्या दोन मार्गांचे लोकार्पण
सकाळी 10.45 -- समृद्धी महामार्ग आरंभबिंदू समृद्धी झिरो माईल पॉईंटवर आगमन
सकाळी 11- रस्ते मार्गाने मिहानकडे प्रस्थान
सकाळी 11.15 ते 11.25 - मिहान एम्स येथे आगमन व एम्सचे औपचारिक उद्घाटन
सकाळी 11.30 - टेम्पल ग्राउंड एम्स सार्वजनिक कार्यक्रम व नव्या प्रकल्प उद्घाटन
दुपारी 12.35 - नागपूर विमानतळाकडे प्रस्थान
दुपारी 12.55 - नागपुरातून विमानाने गोव्यासाठी प्रस्थान