Panvel Central Railway Block : दिनांक 30 सप्टेंबरपासून डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरसाठी अप आणि डाउन 2 नवीन लाईन्सच्या बांधकामासाठी उपनगरीय यार्ड रीमॉडेलिंग कामासाठी पनवेल येथे शनिवार व रविवारच्या सुट्टीमध्ये मध्य रेल्वे एक प्रमुख ब्लॉक चालवत आहे. त्यानंतर पनवेल येथे पोस्ट कमिशनिंग काम म्हणून ईएमयू स्टॅबलिंग साइडिंग क्र. 1, 2, 3, 4 आणि 10, मध्यरात्री 00.30 वाजेपासून ते 5.30 वाजेपर्यंतचा ब्लॉक 2 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून ते 7 ऑक्टोबरपर्यंत पाच दिवस चालवला जाईल.
ब्लॉक कालावधीत 2 ऑक्टोबर (सोमवार/मंगळवार) ते 7 ऑक्टोबर (शनिवार/रविवार) दररोज रात्री ००.३० वाजल्यापासून ०५.३० वाजेपर्यंत या ब्लॉक कालावधीत उपनगरीय सेवा रद्द राहतील. 2 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबरपर्यंत डाऊन हार्बर मार्गावर पनवेलसाठी शेवटची लोकल ट्रेन 22.58 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल आणि 00.18 वाजता पनवेलला पोहोचेल.
02.10.2023 ते 06.10.2023 पर्यंत डाउन ट्रान्स-हार्बर मार्गावरील पनवेलसाठी शेवटची लोकल ठाणे येथून 23.32 वाजता सुटेल आणि दुसरे दिवशी 00.24 वाजता पनवेलला पोहोचेल. अप हार्बर मार्गावर पनवेलहून सुटणारी शेवटची लोकल ब्लॉक कालावधीत वेळापत्रकानुसार असेल.
02.10.2023 ते 06.10.2023 पर्यंत अप ट्रान्स-हार्बर मार्गावर पनवेलहून सुटणारी शेवटची लोकल 22.15 वाजता पनवेलहून सुटेल आणि 23.07 वाजता ठाण्याला पोहोचेल. ब्लॉकनंतर पहिली लोकल ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पनवेलसाठी ब्लॉक कालावधीत वेळापत्रकानुसार असेल.
03.10.2023 ते 07.10.2023 पर्यंत ठाण्याहून पनवेलसाठी ब्लॉक संपल्या नंतर पहिली लोकल ट्रेन 06.20 वाजता ठाण्याहून सुटेल आणि 07.12 वाजता पनवेलला पोहोचेल.
आणखी वाचा - Pune News : पुण्यात चाललंय तरी काय? ससून रुग्णालय प्रवेशद्वारातून ड्रग्जचा साठा जप्त!
03.10.2023 ते 07.10.2023 पर्यंत पनवेलहून अप हार्बर मार्गावरील ब्लॉकनंतर पहिली लोकल ट्रेन पनवेलहून 05.40 वाजता सुटेल आणि 06.59 वाजता CSMT ला पोहोचेल. ब्लॉकनंतर पनवेलहून अप ट्रान्स-हार्बर मार्गावर ठाण्याच्या दिशेने 03.10.2023 ते 07.10.2023 पर्यंत पहिली लोकल ट्रेन 06.13 वाजता पनवेलहून सुटेल आणि 07.05 वाजता ठाण्याला पोहोचेल.