पंकजा मुंडे यांचे हवेत झेपावलेले हेलिकॉप्टर माघारी बोलावले आणि ...

Pankaja Munde : भगवान भक्ती गडावर (Bhagwan Bhakti Gad) आता भाविक आणि मुंडे कुटुंबीय समर्थक यायला सुरुवात झाली आहे.त्याचवेळी त्यांचे हेलिकॉप्टर माघारी बोलविण्यात आले.

Updated: Oct 15, 2021, 01:54 PM IST
पंकजा मुंडे यांचे हवेत झेपावलेले हेलिकॉप्टर माघारी बोलावले आणि ... title=

औरंगाबाद / बीड : Pankaja Munde : भगवान भक्ती गडावर (Bhagwan Bhakti Gad) आता भाविक आणि मुंडे कुटुंबीय समर्थक यायला सुरुवात झाली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) दसरा मेळाव्याच्या माध्यमातून काय बोलणार याचीच उत्सुकता आहे. भगवान भक्ती गडावर खासदार प्रीतम मुंडे यांचे आगमन झाले आहे. पंकजा मुंडे या भगवान गडावर जाण्यासाठी निघाल्या होत्या. त्यांच्या हेलिकॅप्टरने टेकअप घेतला. मात्र, काही वेळात हेलिकॉप्टर माघारी बोलविण्यात आले. (Pankaja Munde Dussehra Melava at Bhagwan Bhakti Gad)

पंकजा मुंडे यांना घेऊन हवेत उडालेल हेलिकॉप्टर पुन्हा परत बोलविण्यात आले. पाच मिनिटात टेकअप झालेले हेलिकॉप्टर पुन्हा भगवान गडाच्या हेलिपॅडवर उतरले गेले. टेक्निकल टीम आणि पोलीस याची पाहणी केली. पाहणीनंतर स्पष्ट झाले की क्लिअरन्स नव्हता. क्लिअरन्स नसल्यामुळे हेलिकॉप्टर पुन्हा माघारी बोलावले गेले. क्लिअरन्स मिळाला की पुन्हा हेलिकॉप्टर टेक्सअफ करेल अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

दुसऱ्यांदा हवाई क्लिअरन्स मिळाला आणि त्यानंतर पंकजा मुंडे या गोपीनाथ गडावरुन औरंगाबादला आणि औरंगाबादनंतर भगवान भक्ती गडावर पोहोचणार आहेत. दरम्यान, दसरा मेळावा साजरा करण्याची प्रथा आमच्या कुटुंबाची आहे, मेळाव्यासाठी स्वयंस्फूर्तीने लोक येतात, असं पंकजा मुंडे यांनी म्हटल आहे. पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा हा भगवान भक्ती गडावर होत आहे. पंकजा मुंडे या तिथे रवाना झाल्या आहेत. पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याची तयारी पूर्ण झालीय.  समर्थकांना सुद्धा ताईंवरील अन्याय दूर व्हावा अशी अपेक्षा आहे. 

आज सावरगाव येथे भगवान भक्ती गडावर दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेला आहे. अनेक वर्षांपासूनची असलेली मुंडे कुटुंबाच्या या दसरा मेळाव्याची परंपरा आहे. मागील दोन वर्ष कोरोनामुळे दसरा मेळावा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आला होता. मात्र यावर्षी मोठ्या संख्येने ऊस तोड कामगार यांच्यासह जिल्ह्यातील कार्यकर्ते या मेळाव्यात उपस्थित आहेत. कोरोना नियम पाळून हा मेळावा साजरा करण्यासाठी प्रशासनाकडून ही परवानगी देण्यात आली आहे. सावरगाव येथील भगवान भक्ती गडावर दसरा मेळावा थोड्याच वेळात होत आहे.