पंढपूर : हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस म्हणजे अक्षय्यतृतीया. हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सध्या संपूर्ण जगावर कोरोनाचं सावटं आहे. त्यामुळे काही नियमांचं पालन करूनचं प्रत्येक सण साजरे करता येत आहेत. अक्षय्यतृतीयेच्या निमित्तानं पंढरपूरच्या विठूरायाच्या मंदिराला 7 हजार आंब्यांची आकर्षक आरास करण्यात आली. यावेळी फक्त आंबे नाहीतर इतर फळांचा देखील वापर करण्यात आला.
आता या कोरोना काळात सर्व तिर्थक्षेत्र बंद आहेत. त्यामुळे घरबसल्या घ्या विठूरायाचं दर्शन