पंढरपूरच्या शाळेत मुलांच्या जीवाशी खेळ, पोषण आहारात सापडला मृत बेडूक

Pandharpur Shaley Poshan Aahar: पंढरपुरात पोषण आहाराच्या मध्ये मेलेली बेंडकुळी सापडली आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Jul 13, 2024, 12:00 PM IST
पंढरपूरच्या शाळेत मुलांच्या जीवाशी खेळ, पोषण आहारात सापडला मृत बेडूक title=
Pandharpur Shaley Poshan Aahar

Pandharpur Shaley Poshan Aahar: शालेय विद्यार्थ्यांची संख्या वाढावी, शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळावा, यासाठी शासन विविध योजना राबवत असते. पण या योजना तळागाळापर्यंत पोहोचेपर्यंत त्याच्या चिंधड्या उडालेल्या असतात. योग्य नियोजन, शिस्तबद्धता, स्वच्छता न पाळल्याने विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतण्याची शक्यता असते. पंढरपूरच्या शाळेत एक किळसवाणा आणि संतापजनक प्रकार समोर आलाय. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

पंढरपुरात पोषण आहाराच्या मध्ये बेडकाचे पिल्लू सापडले आहे. त्यामुळे पालकवर्गातून प्रचंड रोष आणि संताप व्यक्त केला जातोय. लहानग्या जीवाशी शासनाचा खेळ सुरूच असल्याची टीका पालकांकडून केली जातेय. शासनाकडून शालेय विद्यार्थ्यांना शाळे कडे आकर्षित करण्यातही तसेच शाळेची गोडी लागण्यासाठी शासनाने अनेक योजना राबवल्या आहेत. त्यातील एक शालेय पोषण आहार ही योजना अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

पाहा व्हिडीओ 

पंढरपूरच्या कासेगाव येथील भुसे नगर येथील अंगणवाडीमध्ये  हा प्रकार घडला. पोषण आहार वाटप करताना त्या आहारात बेडकाचे मृत पिल्लू सापडले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांनी यानंतर संताप व्यक्त केला आहे. 

शालेय पोषण आहार हा आता विद्यार्थ्यांच्या जीवावर उठला आहे की काय अशी शंका या पोषण आहार पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांच्या मानसिकता मधून दिसत आहे.शालेय पोषण आहारात अशाप्रकारे मेलेला प्राणी सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. राज्यातील विविध जिल्ह्यांतून याआधीदेखील असे प्रकार समोर आले आहेत. अनेकदा तर निकृष्ट दर्जाचे अन्न विद्यार्थ्यांच्या वाट्याला आले आहे.

केवळ महाराष्ट्रच नव्हे तर हैदराबादमध्ये विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये एक प्रकार नुकताच उजेडात आला आहे. 

चटणीच्या टोपात उंदराचा मुक्त विहार 

हैदराबादच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांना किळसवाणा प्रकार दिसला. होस्टेलच्या मेसमध्ये विद्यार्थ्यांना जी चटणी दिली जाते त्यामध्ये उंदीर मुक्तपणे विहार करताना दिसतोय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होतोय. 8 जुलै रोजी महाविद्यालयातून हा प्रकार समोर आला. विद्यापीठाचे कर्मचारी अशाप्रकारे पदार्थांची स्वच्छता राखतात का? असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जातोय. दरम्यान या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी जोर धरु लागली आहे.