'बरसो रे मेघा...', पंचवटी एक्स्प्रेसमध्ये चक्क छत्री घेऊन प्रवास

Maharashtra: Umbrellas out inside Panchavati Express coach with a leaky roof : नाशिक मुंबईला जोडणारी चाकरमान्यांची एक्स्प्रेस म्हणून ओळखली जाणाऱ्या पंचवटी एक्स्प्रेसमध्ये चक्क छत्री घेऊन प्रवास करावा लागतोय.  

Updated: Jul 26, 2022, 12:37 PM IST
 'बरसो रे मेघा...', पंचवटी एक्स्प्रेसमध्ये चक्क छत्री घेऊन प्रवास  title=

नाशिक : Maharashtra: Umbrellas out inside Panchavati Express coach with a leaky roof : नाशिक मुंबईला जोडणारी चाकरमान्यांची एक्स्प्रेस म्हणून ओळखली जाणाऱ्या पंचवटी एक्स्प्रेसमध्ये चक्क छत्री घेऊन प्रवास करावा लागतोय. एसीसह बहुतांश डबे गळके आहेत.  प्रवाशांना आपलं सामान कसं सुरक्षित ठेवावं असा प्रश्न पडला. नाशिक - मुंबई-मनमाड पंचवटी एक्स्प्रेसमधील काही प्रवाशांचा रविवारी रेल्वेच्या आतही पावसापासून बचाव करण्याची वेळ आली. आरक्षित असलेल्या एसी कोचचे छत गळल्यामुळे नाशिक ते मुंबई या संपूर्ण प्रवासात लोकांना कोरडे राहण्यासाठी छत्री वापरावी लागली.

या एक्स्प्रेसचे खास डबे भारतीय कोच कारखान्यामध्ये तयार करण्यात आलेले आहेत मात्र या कोचबाबत सुरुवातीपासून अनेक तक्रारी आहेत. तीन ते चार तासांचा बसून प्रवास करणं या रेल्वेमध्ये सर्वात अवघड आहे. अवघ्या दोन-तीन वर्षातच रेल्वेचे कोच गळू लागल्यानं रेल्वेतील अभियांत्रिकी सुमार दर्जाची आहे हे समोर आलं. नाशिकच्या खासदारांनी यात प्रवास करून प्रवाशांच्या व्यथा जाणून घ्याव्यात, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. 

पंचवटी एक्स्प्रेस. अकदम आरामदायी प्रवास. पण चक्क या गाडीला गळती लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. रेल्वेचा प्रवास म्हणजे आरामदायी, आल्हाददायी, सुरक्षित असा समजला जातो. मात्र  हा समज दूर झाला असून नामुष्की रेल्वे प्रवाशांवर ओढावल्याचे चित्र दिसून आले. पंचवटी एक्स्प्रेसचा एक वातानुकूलित डब्यात पावसाने पाण्याचा धारा लागल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे प्रवाशांना चक्क डोक्यावर छत्री धरुन प्रवास करावा लागला.  

कोरोना लॉकडाऊननंतर आता अनेक महिन्यांनी बंद असलेली पंचवटी एक्स्प्रेस सुरु करण्यात आली. अनेक दिवसांची मागणी मान्य झाली. मात्र, या प्रवासात नवीनच अडचण निर्माण झाल्याने प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. थेट छतातून पाणी प्रवाशांच्या अंगावर पडायला लागले होते. त्यामुळे प्रवाशांना डोक्यावर छत्री धरुन प्रवास करावा लागला. याबाबत विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांच्याकडे तक्रार केली आहे.