महाराष्ट्र पोलिसांच्या पगाराबाबत मोठी बातमी; आताच वाचा नाहीतर...

महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांना सार्वजनिक शासकीय वाहतुकीच्या माध्यमातून प्रवासासाठी पोलीस विभागाकडून विशेष सोय करण्यात आली होती.

Updated: Jun 3, 2022, 02:24 PM IST
महाराष्ट्र पोलिसांच्या पगाराबाबत मोठी बातमी; आताच वाचा नाहीतर...  title=

गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांना सार्वजनिक शासकीय वाहतुकीच्या माध्यमातून प्रवासासाठी पोलीस विभागाकडून विशेष सोय करण्यात आली होती. पोलीस कर्मचाऱ्यांच्या खात्यातून महिना अखेरीस 2700 रुपये प्रत्येकी तर पोलीस अधिकाऱ्यांच्या खात्यातून 5400 रुपये प्रत्येकी असे पैसे वजा करत सार्वजनिक वाहतुकीसाठी देय केले जायचे.

यापूर्वी पोलीस अधिकाऱ्यांना सुविधेमुळे सार्वजनिक शासकीय गाड्यांमधून तिकीट न काढता निशुल्क प्रवास करता येत होता. मात्र यामुळे जे कर्मचारी आणि अधिकारी बेस्ट किंवा परिवहन विभागाच्या बसने प्रवास करत नव्हते त्यांच्याही खात्यातून हे पैसे वजा होत असल्याने त्याचा फटका पोलिसांना बसत होता. 

वित्त विभागाचा मोठ निर्णय - 

आता वित्त विभागाने मोठा निर्णय घेत हा निशुल्क प्रवास बंद केला आहे. ज्या पोलिसांना बसेस किंवा बेस्टचा वापर करायचा आहे. त्यांनी तिकीट काढून प्रवास करावा असा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे सार्वजनिक शासकीय वाहतुकीच्या नावाखाली पोलीस कर्मचाऱ्यांच्या खात्यातून 2700 रुपये आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या खात्यातून जे 5400 रुपये कापले जात होते ते आता कापले जाणार नाहीत. त्यामुळे पोलिसांना हा दिलासा मिळालेला आहे..

वित्त विभागाच्या निर्णयाचा बेस्टला फटका -

बेस्टला सर्वात मोठा फटका बसलेला आहे. बेस्टला मुंबई पोलिसाच्या वतीने महिन्याला 1 लाख रुपये मिळत होते. मात्र आता बंद केल्यामुळे मिळणार नाही. त्यामुळे अगोदर तोट्यात असणाऱ्या बेस्टला आणखी फटका बसणार आहे.