भयानक ! माणुसकी हरवली, वादातून पेट्रोल टाकून एकाला जिवंत जाळलं

भरदिवसा एकावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आलं आहे

Updated: Jun 3, 2022, 01:03 PM IST
भयानक ! माणुसकी हरवली, वादातून पेट्रोल टाकून एकाला जिवंत जाळलं title=

नितेश महाजन, झी मीडिया, जालना : जालनामध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भरदिवसा एकावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आलं आहे. जालनाच्या टाऊनहॉल परिसरात ही घटना घडली आहे.  संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद.   

नेमकं काय घडलं?

तुकाराम मंडाळ हे इमारतीच्या वाहन पार्किंगमध्ये कामगारांसोबत चर्चा करत होते. पाठीमागून आलेल्या सुरज देशमुख नावाच्या व्यक्तीने त्यांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांमा पेटवून दिले. अचानक घडलेल्या घटनामुळे एकच गोंधळ उडाला. त्याठिकाणी असलेल्या नागरिकांनी मंडाळ यांना वाचवण्यासाठी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मंडाळ यांना तातडीने औरंगाबाद येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान याप्रकरणी सुरज देशमुखविरोधात कदीम पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

इमारत बांधकामाच्या वादातून घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. मंडाळ हे 50 टक्के भाजल्याचे समजते आहे. त्यांच्यावर औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.