Nana Patole : सत्यजित तांबे यांना काँग्रेसचा पाठिंबा नाही, नाना पटोले म्हणाले - पुढचा निर्णय हायकमांड घेणार !

Nana Patole On BJP : भाजपला आज दुसऱ्यांचे घर फोडताना आनंद होत आहे. त्यांचे घर फुटेल तेव्हा त्यांना याच दुःख कळेल, अशी प्रतिक्रिया नाशिकमधील नाट्यमय घडामोडीनंतर नाना पटोले यांनी दिली

Updated: Jan 13, 2023, 01:32 PM IST
Nana Patole : सत्यजित तांबे यांना काँग्रेसचा पाठिंबा नाही, नाना पटोले म्हणाले - पुढचा निर्णय हायकमांड घेणार ! title=

Nana Patole On Satyajeet Tambe  : नाशिक पदवीधर मतदार संघातून ( Nashik Graduate Constituency Election ) काँग्रेसकडून (Congress) सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. (Maharashtra Political News) मात्र, नाट्यमय घडामोडीनंतर सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज  दाखल केला. (Maharashtra Political News) परंतु काँग्रेसकडून अधिकृत उमेदवारी मिळूनही सुधीर तांबे यांनी अर्ज भरलाच नाही. यानंतर काँग्रेसमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सत्यजित तांबेंनी धोका दिला आहे. त्यामुळे त्यांना काँग्रेसचा पाठिंबा नाही, पुढचा निर्णय हायकमांड घेणार, अशी माहिती प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली. त्याचवेळी कारवाईचा इशारा दिला. (Maharashtra News in Marathi)

नाट्यमय घडामोडी... अखेरच्या क्षणी काँग्रेसकडून सत्यजित तांबे रिंगणात

नाशिक पदवीधर मतदार संघातून सत्यजित तांबे यांनी अर्ज भरल्यामुळं काँग्रेस पक्षश्रेष्ठी नाराज आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे. काँग्रेसची अधिकृत उमेदवारी जाहीर होऊनही सुधीर तांबे यांनी अर्ज न भरल्याने त्यांच्यावर कारवाईची शक्यता आहेत. तर जे घडलं ते चांगलं नाही, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी व्यक्त करत नाराजी बोलून दाखवली. नाशिकमध्ये जे झालं त्याची इत्यंभूत माहिती हायकमांडला दिली आहे. त्यांचा आज निर्णय होईल. सत्यजित तांबे यांना काँग्रेसच समर्थन नाही. काल दुपारीपर्यंत बाळासाहेब थोरात संपर्कात होते. या घटनाक्रमनंतर ते संपर्कात नाहीत. बंडखोरांना काँग्रेस समर्थन देणार नाही, असे नाना पटोले यांनी बजावले. दरम्यान, नागपूरच्या उमेदवार निर्णय दोन दिवसात होईल, असे ते म्हणाले.

भाजपला आज दुसऱ्यांचे घर फोडताना आनंद होतोय - पटोले

भाजपला आज दुसऱ्यांचे घर फोडताना आनंद होत आहे. त्यांचे घर फुटेल तेव्हा त्यांना याच दुःख कळेल, अशी प्रतिक्रिया नाशिकमधील नाट्यमय घडामोडीनंतर नाना पटोले यांनी दिली. भाजप दुसऱ्याचे घर तोडण्याची, फोडण्याची काम करत आहे. त्यांचेही घर एकदिवस फूटल्याशिव राहणार नाही, असे नाना पटोले म्हणाले.

सत्यजित तांबे यांचा नाशिकमधून अपक्ष उमेदवारी अर्ज 

सत्यजित तांबे यांनी नाशिकमध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने एकच खळबळ उडाली आहे. यावर प्रतिक्रिया देतांना  नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. नाशिकमध्ये आमचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे होते. दोघेही पिता पुत्र एकाच गाडीत बसून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेले होते. माझे दोघांशी बोलणं झालं होतं. त्यानंतर काय घटना झाली, नेमकं काय झालं? याची माहिती नाही. माहिती घेऊन पुढची रणनिती ठरवू, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली. त्यांनी यावेळी भाजवर जोरदार टीका केली आहे.  

दुसरीकडे राज्यात आज mpsc च्या परीक्षेसाठी राज्यात आंदोलन सुरु आहे. नव्या अभ्यासक्रमनुसार परीक्षा होतील. आज राज्यात गरिबांचे मुले मुली, लाखो रुपये खर्चून तयारी करावी लागते, आज आम्ही mpsc च्या धोरणाचा निषेध करीत आहे. जर सरकारने आंदोलन कर्त्यांचे ऐकले नाही तर विधानसभेत आम्ही हा मुद्दा उचलू, असा इशारा नाना पटोले यांनी राज्य सरकारला दिला.