मुंबई : शेतक-यांना तातडीचं दहा हजार रुपये कर्ज देण्याची घोषणा करुन २४ तास उलटले तरीही जिल्हा बँकांना याबाबतचे कोणतेही आदेश मिळालेले नाहीत. बि-बियाण्यांसाठी शेतक-यांना दहा हजार रुपये तातडीचे कर्ज देण्याचे आदेश सरकारनं दिले होते. मात्र अशी कोणतीही मदत शेतक-यांना देण्यास जिल्हा बँकांनी असमर्थता दर्शवली आहे.
कोणताही सरकारी आदेश आला नसल्याचा दावा जिल्हा बँकांकडून करण्यात येतो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा संतापाची भावना आहे. शेतकऱ्यांना पुन्हा बँकांमधून निराशा घेऊन परत जावं लागतं आहे.