हलाखीची परिस्थीती असतानाही त्यांना नाकारली गेली गॅस सबसिडी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गॅसवरील सबसिडी सोडण्याचे आवाहन देशवासियांना केलं होतं. त्यांच्या या आवाहनाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. मात्र जळगावात वेगळाच प्रकार समोर आलाय. 

Updated: Jun 14, 2017, 09:11 PM IST
हलाखीची परिस्थीती असतानाही त्यांना नाकारली गेली गॅस सबसिडी title=

विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गॅसवरील सबसिडी सोडण्याचे आवाहन देशवासियांना केलं होतं. त्यांच्या या आवाहनाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. मात्र जळगावात वेगळाच प्रकार समोर आलाय. 

हे आहेत जळगावच्या धरणगाव तालुक्यातील बिलखेडा गावचे भंगार व्यावसायिक ईश्वर पाटील. त्यांच्या हातात असलेलं हे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वाक्षरी असलेलं पत्र. गॅसची सबसिडी नाकारल्याबद्दलचं हे पत्र ईश्वर पाटील यांच्या घरच्या पत्त्यावर आलंय. 

मात्र ईश्वर पाटील यांच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे. गावोगावी फिरुन भंगार गोळा करण्याचा व्यवसाय ते करतात. त्यांच्याकडे एका गॅसचं कनेक्शन आहे. त्यामुळे ती नाकारली नसल्याचं ईश्वर पाटील यांनी म्हटलंय. पंतप्रधानांची योजना चांगली असली तरी आपल्याला आलेलं पत्र चुकीचं असल्याचं ईश्वर पाटील यांनी सांगितलंय. 

गरीब आणि गरजूंच्या बँक खात्यात गॅस सबसिडी जमा होते. मात्र ईश्वर पाटील यांना आलेल्या या पत्रामुळे त्यांच्या खात्यात ही सबसिडी जमा होत नाही. ही सबसिडी आपल्या बँक खात्यात वर्ग करावी यासाठी ईश्वर पाटील यांनी बँकेत तक्रारही केलीय. मात्र तिथेही त्यांना न्याय मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केलीय.