...मग उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन का केला? Disha Salian प्रकरणात नितेश राणेंचा आणखी एक खळबळजनक दावा

Disha Salian Death Case : दिशाच्या मृत्यूपूर्वीच्या पार्टीत कोण कोण होतं? पार्टीत मंत्री कोण होता? आणि हा तपास कुणाच्या राजकीय दबावामुळे थांबला? याची चौकशी करण्याची मागणी नितेश राणे यांनी केली आहे.  आदित्य ठाकरे निर्दोष आहेत तर उद्धव ठाकरे यांनी माझ्या वडिलांना अर्थात नारायण राणेंना माझ्या मुलाला वाचवा असा फोन का केला होता असा सवाल उपस्थित केला होता. 

Updated: Dec 22, 2022, 04:52 PM IST
...मग उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन का केला? Disha Salian प्रकरणात नितेश राणेंचा आणखी एक खळबळजनक दावा title=

Disha Salian Death Case : सालियन मृत्यू प्रकरणावरुन हिवाळी अधिवेशानात ( Maharashtra Winter Session 2022 ) चांगलाच गदारोळ माजला आहे.  शिंदे गटाचे (Shinde Group) खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी काल आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यानंतर आता भाजप आमदार नितेश राणे(Nitesh Rane) यांनी देखीलखळबळजनक दावा केला आहे.  आदित्य ठाकरेंवर होत असलेल्या आरोपांमुळे Disha Salian प्रकरणाला धक्कादायक वळण लागले आहे.

दिशाच्या मृत्यूपूर्वीच्या पार्टीत कोण कोण होतं? पार्टीत मंत्री कोण होता? आणि हा तपास कुणाच्या राजकीय दबावामुळे थांबला? याची चौकशी करण्याची मागणी नितेश राणे यांनी केली आहे.  आदित्य ठाकरे निर्दोष आहेत तर उद्धव ठाकरे यांनी माझ्या वडिलांना अर्थात नारायण राणेंना माझ्या मुलाला वाचवा असा फोन का केला होता असा सवाल उपस्थित केला होता. 

नितेस राणेंनी केली आदित्य ठाकरेंच्या नार्को टेस्टची मागणी

दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा अशी मागणी नितेश राणेंनी केली. सुशांत सिंग, दिशा सालियान प्रकरण समोर येतं तेव्हा आदित्य ठाकरेंचेच नाव का घेतले जाते? असा सवाल उपस्थित करत दाल मे कुछ काला है
असं राणे म्हणालेत. तर ए फॉर आदित्य म्हणत शेवाळेंच्या आरोपांना राणेंनी दुजोरा दिलाय. तसंच मुंबई पोलिसांनी दिशा सालियन केस रिओपन करावी अशी मागणी त्यांनी केली.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिशा सालियन प्रकारणात महत्वाची घोषणा

दिशा सालियन मृत्यूप्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत होणार असल्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात जाहीर केले. दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा तपास सीबीआयकडे कधीच नव्हता, त्यामुळे सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दिलेला नाही असंही फडणवीस सभागृहात म्हणाले. 

दिशा सालियन प्रकरणावरून विधानसभेत तुफान गदारोळ झाला. पाच वेळा कामकाज स्थगित झालं. दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचं राजकारण कोणी करू नये, राजकीय अँगलने या मुद्द्याकडे पाहू नये असं आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केले.
आदित्य ठाकरेंवर काय आरोप झालाय?

अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) A U नावाने 44 फोन आले होते, हा A U म्हणजे आदित्य-उद्धव (Aditya-Uddhav Thackeray) असल्याची बिहार पोलिसांनी (Bihar Police) माहिती दिल्याचा गौप्यस्फोट राहुल शेवाळे यांनी केला होता. यावरुनच हिवाळी अधिवेशनात देखील गदारोळ माजला आहे.  विविध मुद्यांवरुन जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी हे जुन प्रकरण उकरुन काढल्याचे प्रत्युत्तर आदित्य ठाकरे यांनी दिले आहे.