नाशिक : येत्या विधानसभा निवडणुकीत सत्ता परिवर्तन होणार आहे, हे निश्चित. २०१९मध्ये मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल आणि मंत्रिमंडळही, असा विश्वास शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलाय. दरम्यान, भाजपने वारंवार सेना-भाजप युती होईल, असे वक्तव्य केलेय. तसे प्रयत्नही सुरु केलेत. मात्र, राऊत यांनी तसं काहीही नाही, हेच सूचित केलेय. स्वबळाची भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वारंवार मांडली आहे, त्यादृष्टीनेच आमची रचना सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नाशिक येथे शासकीय विश्रामगृहात खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिवसेनेची स्वबळाची भूमिका राष्ट्रीय कार्यकारिणीत ठरली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हीच भूमिका वारंवार मांडली आहे. राज्यात आगामी निवडणुकीत परिवर्तन होईल, शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल, मंत्रीमंडळही आमचेच असेल, अशी आम्हाला खात्री आहे. नाशिकसह उत्तर महाराष्ट्र शिवसेनेला सत्तेचा मार्ग दाखवील, असे आशादायक वातावरण असल्याचेही त्यांनी सांगितले.
युती होईल असे सांगणारे भाजपावाले शिवसेनेचे प्रवक्ते नाहीत, असा टोलाही त्यांनी हाणला. २०१४ साली तोडलेली युती आता २०१९ला व्हावी, असे भाजपाला का वाटते, असा कोणता फरक झालाय की आता युती करण्याची दाट इच्छा होतेय, असेही त्यांनी भाजपाला सुनावले.
- २०१९ मध्ये मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल.
- शिवसेनची स्वबळाची भूमिका कायम
- भाजपाची युतीची ईच्छा २०१४ साठी कुठे दाबली गेली होती.
- २०१४ साली तोडलेली युती २०१९ ला का करावी वाटते, त्याची कारणे त्यांनी सांगावीत.
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेट मुख्यमंत्री भाजपचे आहे म्हणून जायचं नाही ही शिवसेनीची संस्कृती नाही.
- गिरीष महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आरती ओवाळने बंद करून जनतेचे प्रश्न सोडवावे. त्यांच्या जामनेर मतदार संघात दोन दिवसा आडपाणी येते.
- मुख्यमंत्र्यांकडे जादू असून ते चमत्कारी आहे या गिरीष महाजनांच्या वक्तव्याविरोधा अंनीसला तक्रार दाखल करायची संधी, अनीस दाभोळकर यांनी या वक्तव्यचा अभ्यास करावा
-मुख्यमंत्र्यांकडे चमत्कार असेल तर त्यांनी राज्यातील दुष्काळासारखे प्रश्न या चमत्काराने सोड़वावेत
- राम शिंदे यांना मतदार २०१९ ला पाहुण्यांकडे ठेवतील
- केंद्रीय पथकाला झेड प्लस सुरक्षा घेऊन फिरण्याची वेळ आली आहे, त्यांना हल्ल्याची भीती का वाटते ?
- नितीन गडकरी त्यांची प्रकृती लवकर सुधारावी. गडकरी यांनी हेल्थबाबत पंतप्रधानांकडून टीप्स घ्याव्यात. पंतप्रधान जगभर फिरून देखील त्यांची तब्येत खराब होत नाही.
- हिरे कुटुंब अनेकांच्या संपर्कात, तसे माझ्याही संपर्कात होते, ते आता राष्ट्रवादीत गेले. उद्या कुठे जातील, हे सांगू शकत नाही.