शिर्डी : साईबाबांच्या दर्शनानं नव्या वर्षाची सुरुवात करण्यासाठी शिर्डीत भाविकांनी गर्दी केलीय. लाखो साईभक्त शिर्डीत दाखल झालेत. रात्रभर साईमंदिर खुलं ठेवण्यात आलं होतं.
विशेष म्हणजे रात्री बाराच्या ठोक्याला साईंच्या मंदिरात मोठी गर्दी झाली होती.12 वाजताच साईंचा गजर करत भक्तांनी नव वर्षाचे स्वागत केलय. शिर्डीतले सगळे रस्ते गर्दीने फुलुन गेले होते. अनेक व्हीआयपींनीही साईंचं दर्शन घेतलं.
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान, राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनीही साईबाबांचं दर्शन घेतलं.
नववर्षाचे स्वागत सा-यांनी देवदर्शनाने केलंय. विविध देवस्थानं भक्तांनी फुलून गेल्याचं चित्र पाहायला मिळालं. मुंबईत प्रभादेवी इथल्या सिद्धीविनायक मंदिरात रविवारपासूनच भक्तांची गर्दी पाहायला मिळतेय. आधी वंदू तुज मोरया म्हणत भक्तांनी नव्या वर्षाचा शुभारंभ केलाय. नव्या वर्षाच्या आरतीला भक्तांनी गर्दी केली होती...