कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणी नवी माहिती उजेडात

गोविंद पानसरे यांच्यावर गोळीबार केल्यानंतर संध्याकाळी कोल्हापुरातील टेंबलाईवाडी परिसरात पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी डॉ. वीरेंद्र तावडे, भरत कुरणे, अमोल काळे आणि इतरांची बैठक झाली होती.  

Updated: Dec 7, 2018, 08:45 PM IST
कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणी नवी माहिती उजेडात title=

कोल्हापूर : गोविंद पानसरे यांच्यावर गोळीबार केल्यानंतर संध्याकाळी कोल्हापुरातील टेंबलाईवाडी परिसरात पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी डॉ. वीरेंद्र तावडे, भरत कुरणे, अमोल काळे आणि इतरांची बैठक झाली होती. या बैठकीत डॉ. वीरेंद्र तावडे यानं पानसरे हत्या प्रकरणात वापरलेले पिस्तुल भरत कुरणे याच्याकडे दिल्याचं एसआयटीच्या तपासात उघड झालंय. 

इतकच नव्हेतर हे पिस्तुल नंतर भरत कुरणे यानं गडहिंग्लज मार्गे बेळगावला नेल्याचं तपासात स्पष्ट झालंय. संशयीत आरोपी भरत कुरणे आणि वासुदेव सूर्यवंशी यांची पोलीस कोठडी आज संपल्यामुळे त्यांना कोल्हापूरच्या न्यायालयात हजर करण्यात आलं होत. यावेळी या दोघांना अधिकची पोलिस कोठडी मिळावी यासाठी सरकारी वकील एडवोकेट शिवाजीराव राणे यांनी कोर्टात युक्तिवाद केला;  त्यावेळी ही माहिती समोर आली.

आतापर्यंत या आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. त्यामुळे कोर्टाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करावी, अशी मागणी केली. कोर्टाने दोन्ही बाजुचा युक्तिवाद ऐकून भरत कुरणे आणि वासुदेव सूर्यवंशी याना आणखी सात दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.