माथेरान : साधारण दीड वर्षांपूर्वी सलग दोन अपघात झाल्याने बंद ठेवण्यात आलेली माथेरान मिनीट्रेनची सेवा ३१ ऑक्टोबर पासून अमन लॉज ते माथेरान या दोन किमीच्या टप्प्यात सुरू झाली. आता माथेरानला जाणा-यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे.
आता नेरळ ते माथेरान अशा संपूर्ण २० किमीच्या टप्प्यात मार्च २०१८ पर्यंत मिनीट्रेन सुरु होणार आहे. दीड वर्षांपूर्वी माथेरानच्या राणीचे डबे सलग दुसऱ्यांदा घसरण्याची घटना घडल्यानंतर ही सेवा दुरूस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्यात आली होती. या ट्रेनच्या रूळांची दुरूस्ती आणि डबे दरीत कोसळण्याची भीती दुर करण्यासाठी एकूण १८ कोटीचे बजेट मंजूर करण्यात आले.
माथेरानच्या राणीला तीनशे ऐवजी आता सहाशे हॉर्स पॉवरची दोन इंजिन जोडण्यात आली असून हाताने दाबण्याच्या ब्रेक एवजी एअर ब्रेक बसविण्यात आले आहेत. नेरळ ते माथेरानच्या टप्प्यासाठी ट्रॅक आणि इतर दुरूस्तीच्या कामाचे कंत्राट नोव्हेंबर महिन्यात दिले असून काम वेगात सुरु आहे..
माथेरान