Maharastra Politics: "शिंदे मुख्यमंत्री व्हावेत ही ठाकरेंची इच्छा", 4 वर्षानंतर 'या' बड्या नेत्याचा खुलासा!

Maharastra Politics:  सिनियर म्हणून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना गळ घालण्यात आली. पवारसाहेबांनी (Sharad Pawar) तसा आग्रह केला.

Updated: Feb 19, 2023, 08:33 PM IST
Maharastra Politics: "शिंदे मुख्यमंत्री व्हावेत ही ठाकरेंची इच्छा", 4 वर्षानंतर 'या' बड्या नेत्याचा खुलासा! title=
uddhav thackray, eknath shinde

Chhagan bhujbal on Eknath shinde: केंद्रीय निवडणूक आयोगाच्या (Election Commission Of India) निर्णयानंतर राज्याच्या राजकारणात (Maharastra Politics) मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. शिवसेना (Shiv Sena) आणि धनुष्यबाण (Dhanushyaban) आता शिंदे गटाकडे गेल्याने राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. अशातच आता माजी मंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी खळबळजनक दावा केला आहे. 

अगदी सुरुवातीला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी सुचविण्यात आलं होतं, असा खुलासा छगन भुजबळ यांनी केला आहे. पण सिनियर म्हणून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना गळ घालण्यात आली. पवारसाहेबांनी (Sharad Pawar) तसा आग्रह केला. म्हणून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी (Maharastra CM) आवाहन करण्यात आलं होतं, असा खुलासा छगन भुजबळांनी केली आहे.

नेमकं काय म्हणाले Chhagan bhujbal?

मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  आणि सुभाष देसाई (Subhash Desai) अशी काही नावं पुढे केली होती. मात्र शरद पवार उद्धव ठाकरेंच्या नावासाठी आग्रही होते, असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलंय. काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीमधील (NCP) जे आमदार मंत्री होणार, ते अनेकजण हे सिनियर असल्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदासाठी गळ घालण्यात आली असं भुजबळांनी सांगितलंय.

आणखी वाचा - सध्याचे मुख्यमंत्री आता काय चाटतात? गृहमंत्र्यांना प्रत्युत्तर देताना राऊत यांची जीभ घसरली

दरम्यान, संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटावर आगपाखड केली होती. शिंदे गटाने 2 हजार कोटींची डील केल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यावर बोलताना मला फार काही बोलता येणार नाही, असं म्हणत विषय संपवण्याचा प्रयत्न केला. तर यावर महाराष्ट्राची जनात काय म्हणते हे बघावे लागेल, असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.