कोल्हापूर : Hasan Mushrif On CM Eknath Shinde : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी जोरदार हल्लाबोल चढवला आहे. महाविकास आघाडी सरकाने महत्वाचे निर्णय घेतले होते. दूरचा विचार करुन निर्णय घेतले गेले होते. मात्र, आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपच्या सांगण्यावरुन निर्णय बदलत आहेत, अशा थेट आरोप हसन मुश्रीफ यांनी घेतलेल्या पत्रकार परिषद केला. आम्ही सदस्यांमधून सरपंच निवडीचा निर्णय आम्ही घेतला होता. त्यावेळी नगर विकास खात्याचे मंत्री आणि आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच याबाबत त्यावेळी प्रस्ताव मांडला होता. आता पाहा त्यांच्यावर काही वेळ आली आहे, असा टोला मुश्रीफ यांनी लगावला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने सरपंच पद निवडण्याचा निर्णय बदलला आहे. लोकनियुक्त सरपंच निवडून येतात ते सदस्यांना विश्वासात घेत नाहीत. त्यामुळे विकासावर परिणाम होतो. हा विचार करुन आम्ही सदस्यांमधून सरपंच निवडण्याचा निर्णय घेतला होता. एकनाथ शिंदे यांनीच याबाबत त्यावेळी प्रस्ताव मांडला होता. मात्र, या निर्णयाचा सरकारने फेरविचार करावा, अशी आम्ही मागणी करतो, असे मुश्रीफ म्हणाले.
बाजार समिती निवडणुकीचा खर्च बाजार समितीला परवडणार आहे का, असा सवाल यावेळी मुश्रीफ यांनी केला. आताच्या सरकारचा हा निर्णय व्यवहारी नाही हे त्यांच्या लक्षात येईल. युतीच्या काळातील हे कायदे आम्ही राजकारण म्हणून बदलले नव्हते तर ते व्यवहारी होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच त्यावेळी घेतलेला निर्णय बदलण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे, अशी टीका केली.
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये देण्याबाबत आम्ही निर्णय घेतला होता. पण कोरोनामुळे आम्ही ते देऊ शकलो नाही. पण अजित पवार यांनी अधिवेशनात याबाबत तरतूद केली होती. केवळ आम्ही केलेल्या ठरावाची केवळ अंमलबजावणी लवकरात लवकर करावी ही विनंती, असे आवाहन हसन मुश्रीफ यांनी केले.