कोल्हापूर : Kolhapur Shiv Sena Melawa : शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर पक्षात मोठी फुट पडताना दिसत आहे. आता शिंदे गट आणि मूळ शिवसेना यांच्यात जोरदार शक्तिप्रदर्शन सुरु आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांना पाठिंबा शिवसेनेतील अनेक पदाधिकारी, नगरसेवक यांनी पाठिंबा दिला आहे. शिवसेनेत फुट पडल्यानंतर शिवसेना आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. आता जिल्ह्यात शिवसेनेकडून मिळावा घेण्यात येत आहे. कोल्हापुरात शिवसेनेचे कट्टर समर्थक संजय पवार (Sanjay Pawar) यांनी मेळावा घेतला. यावेळी काहींना मेळाव्याला जाऊ नका, असे सांगण्यात आले. यावेळी शिवसैनिकांच्या केसाला धक्का लागला तर सोडणार नाही, असे थेट इशारा संजय पवार यांनी दिला आहे.
कोल्हापूरची जबाबदारी असणारे संजय पवार यांनी सांगितले की, मेळाव्याला जाऊ नका, असा काहींनी शिवसैनिकाना निरोप दिला जात आहे. काहींनी वाटत होतं मीच सगळा गाडा ओढतोय. पण दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी तुम्ही इथं आलात. तुमचे धन्यवाद. शिंदेचे होर्डिंग लागले, पण नाव लिहायचं धाडस कोल्हापूरमध्ये झालं नाही. हा दरारा शिवसेनेचा आहे.
काही लोक म्हणतात 36 वर्षांपेक्षा जास्त पक्षाचं काम करतो. मग आम्ही काय केलं, असे सांगून संजय पवार यांनी येणारी विधानसभा शिंदे गटाकडून लढवून दाखवा, असे थेट आव्हान राजेश क्षीरसागर यांना दिले आहे. तुमच्या कपाळावर आणि पाठीवर गद्दार म्हणून पडलेला शिक्का तुम्ही कधीही पुसू शकत नाही, असा घणाघात संजय पवार यांचा राजेश क्षीरसागर यांच्यावर केला.
शिवसेनेत असे गद्दार राहता कामा नये. अशा गद्दारांची हकालपट्टी करा. पुन्हा एकदा सांगतो आमच्या नादाला लागू नका. शिवसैनिकांच्या केसाला धक्का लागला तर सोडणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. शिवसेना जिल्हा मेळाव्यात संजय पवार यांनी राजेश क्षीरसागर यांच्यामागील प्रेसमधील ऑडिओ ऐकवला. ज्यात राजेश क्षीरसागर निवडून येण्यासाठी शिवसेनाच पाहिजे, असं नाही हा उल्लेख होता. शिवाय चंद्रकांत पाटील यांच्यावर केलेले आरोप आणि आताची त्यांची भूमिका हे सुद्धा ऐकवली.