राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची प्रकृती बिघडली; एअर अँम्ब्युलन्सने मुंबईत आणले

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसें यांची प्रकृती बिघडली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईत आणले जाणार आहे. 

Updated: Nov 5, 2023, 11:34 PM IST
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची प्रकृती बिघडली; एअर अँम्ब्युलन्सने मुंबईत आणले title=

Eknath Khadse Heart Attack : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. खडसे यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना तातडीने एअर अँम्ब्युलन्सने मुंबईत हलवण्यात आले आहे. तशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्या होत्या. खडसे यांच्यावर मुंबईत पुढील उपचार केले जाणार आहेत. 

रविवारी रात्री उशीरा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंना उपचारांसाठी मुंबईत आणलंय.. त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. खडसेंना हृदयाचा त्रास जाणवू लागल्यानं त्यांना जळगावहून मुंबईला आणण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्यासाठी एअर अँब्युलन्सची व्यवस्था करून दिली. खडसेंवर आधी जळगावच्या गजानन हार्ट केअर हॉस्पिटलमध्ये उपचार झाले. आता त्यांच्यावर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये पुढील उपचार सुरू आहेत.