Sharad pawar: '...लवकरच संधी मिळेल', पवारांनी भाषण थोडक्यात आटोपलं, पण अजित पवारांची एकच चर्चा!

Sharad Pawar Speech in Shirdi: हाताला पट्टी, निस्तेज चेहरा आणि क्षीण आवाजात शरद पवारांचं भाषण... पवार (Sharad Pawar Speech) शिबिरात आल्याने कार्यकर्त्यांच्या अंगात उत्साह संचारला.

Updated: Nov 5, 2022, 07:52 PM IST
Sharad pawar: '...लवकरच संधी मिळेल', पवारांनी भाषण थोडक्यात आटोपलं, पण अजित पवारांची एकच चर्चा! title=
Sharad Pawar Speech in Shirdi ajit pawar absent

Maharastra Politics, Sharad Pawar : हाताला पट्टी, निस्तेज चेहरा आणि क्षीण आवाज असताना देखील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिर्डीच्या शिबिराला उपस्थिती लावली. गेल्या 6 दिवसांपासून शरद पवार (NCP Sharad Pawar) आजारी आहेत. ब्रीज कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अशा परिस्थितीत शरद पवार शिर्डीत दाखल होत भाषण देखील केलं. त्यामुळे शरद पवारांच्या उत्साहाची एकच चर्चा होताना दिसत आहे.

शरद पवार (Sharad Pawar Speech)  शिबिरात आल्याने कार्यकर्त्यांच्या अंगात उत्साह संचारला. पवारांनी माईक हातात घेतात कार्यकर्ते भावूक झाले आणि त्यांनी टाळ्यांचा कडकडाटाने पवारांचं स्वागत केलं. त्यावेळी कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी घोषणाबाजी देखील केली. त्यावेळी अवघ्या काही मिनिटात पवारांनी भाषण आटोपलं आणि उर्वरित भाषण वाचण्याची जबाबदारी दिलीप वळसे पाटलांकडे सोपवली. पहिल्या पाच मिनिटात काय म्हणाले शरद पवार...

आणखी वाचा- शरद पवार हॉस्पीटलमधून थेट स्पॉटवर; राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन

काय म्हणाले शरद पवार?

मी सगळ्यांची भाषणं ऐकली नाहीत, पण काही भाषणं ऐकण्याची संधी मिळाली. सध्या मी एवढंच सांगूतो की, आज मला सविस्तर बोलणं शक्य नाही. कारण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तसा सल्ला दिलाय. राष्ट्रवादीचा (NCP) कार्यकर्ता पूर्ण ताकदीने हा पक्ष मजबूत करणार आहे. महाराष्ट्रात परिवर्तन घडवण्याची ताकद आणि हिंमत कार्यकर्त्यांमध्ये आहे, ही संधी लवकरच मिळेल, असं सुचक वक्तव्य पवारांनी यावेळी केलं.

पाहा भाषण -

...अजित पवारांची चर्चा

प्रकृती ठीक नसताना देखील शरद पवार (Sharad Pawar In manthan Shibir) यांनी मंथन शिबिराला हजेरी लावली. तर दुसरीकडे अजित पवार (Ajit Pawar) कार्यक्रम सुरू असताना मधून निघून गेले, अशी माहिती आहे. त्यांच्या वैयक्तिक कामासाठी ते बाहेर गेले आहेत, अशी माहिती देखील मिळाली होती. त्याचबरोबर खासदार अमोल कोल्हे देखील गैरहजर असल्याने राष्ट्रवादीच्या गोत्यात एकच चर्चा होताना दिसत आहे.