Sharad Pawar यांना जीवे मारण्याची धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

Updated: Dec 14, 2022, 10:02 AM IST
Sharad Pawar यांना जीवे मारण्याची धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात title=

Sharad Pawar Death Threat : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.  (Death threat to Sharad Pawar) पवारांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी अज्ञात व्यक्तीनं फोन करून शरद पवारांना ठार मारण्याची धमकी दिल्यानं खळबळ उडाली असून त्यानंतर आता पोलिसांनी धमकी देणाऱ्याचा शोध सुरू केला आहे. अखेर आज (14 डिसेंबर ) पोलिसांनी अज्ञात व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. काल पवार यांचा वाढदिवस झाला. (Maharashtra Political News) यापूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आता थेट शरद पवारांना ठार मारण्याची धमकी देण्यात आल्यानं मुंबईत खळबळ उडाली आहे.

फोन करणाऱ्या व्यक्तीची हिंदीतून धमकी 

फोन करणाऱ्या व्यक्तीने हिंदीतून ही धमकी दिली आहे. पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावरील ऑपरेटरने दिलेल्या तक्रारीनुसार गावदेवी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. काल 12 डिसेंबर रोजी पवारांचा वाढदिवस होता. अशीवेळी या धमकीचा फोन आला. या धमकीच्या फोनची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे.

वाचा:  शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी, मुंबईच्या घरी फोन

याआधीही शरद पवार यांना धमकी

दरम्यान, याआधीही शरद पवार यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या तरुणाने शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर पोलिसांकडून चौकशी सुरु करण्यात आली. त्यानंतर निखिल भामरे या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. हा तरुण बागलाणकर या युजरनेमचा वापर करत होता. त्यांने आक्षेपार्ह ट्विट केलं होतं. या ट्विटमध्ये लिहिलं होतं, 'वेळ आली आहे बारामतीच्या गांधीसाठी, बारामतीचा नथुराम गोडसे तयार करायची. #बाराचा_काका_माफी_माग.' या ट्विटवरून जितेंद्र आव्हाडांनी महाराष्ट्र पोलिसांना टॅग करत कठोर कारवाईची मागणी केली होती.