दुष्काळाच्या झळा : नाही... हे भिक्षुक नाहीत तर आदिवासी शेतकरी आहेत!

रस्त्याच्या कडेला भिक्षुकांचा जसा संसार असतो तसाच संसार आदिवासी शेतकरी आणि दुर्गम भागातील लोकांना मांडावा लागतोय

Updated: May 14, 2019, 10:11 AM IST
दुष्काळाच्या झळा : नाही... हे भिक्षुक नाहीत तर आदिवासी शेतकरी आहेत! title=

किरण ताजणे, झी २४ तास, नाशिक :  राज्यातील पाणीदार जिल्हा म्हणून ज्या नाशिक जिल्ह्याला ओळखलं जात, त्याच नाशिक जिल्ह्याच्या अनेक तालुक्यांमधील लोकांना भीषण दुष्काळामुळे शहराकडे स्थलांतरित व्हावं लागतय. पाण्याचा आणि रोजगारचा प्रश्न निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणात खेड्या पाड्यातील लोक स्थलांतरित होऊ लागले आहे. 

रस्त्याच्या कडेला भिक्षुकांचा जसा संसार असतो तसाच संसार आदिवासी शेतकरी आणि दुर्गम भागातील लोकांना मांडावा लागत आहेत. जेवणाबरोबर सर काही उघड्यावरच कराव लागतय. त्याचे कारण म्हणजे नाशिक जिल्ह्यातील दुष्काळ. गावाकडे पडलेल्या भीषण दुष्काळामुळे नाशिकच्या त्रंबकेश्वर हरसुल पेठ या तालुक्यांमधील आदिवासी शेतकरी नाशिक शहराकडे स्थलांतरीत होत आहेत. शहराच्या पेठ रोड आणि त्रंबक रोड लगत असलेल्या मोकळ्या जागेत या आपला संसार थाटलाय. स्थलांतरित झालेल्या आदिवासी शेतकर्‍यांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी रस्त्याच्या कडेला उघड्यावर आपला संसार थाटलाय. पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल अशा ठिकाणी उघड्यावर तीन दगडांची दगडाची चूल करून त्यावर स्वयंपाक करायचा आणि हाताला मिळेल ते काम करायचं. कामावर जाताना हा सारा संसार असाच रामभरोसे सोडून जावा लागतो, असा या स्थलांतरित लोकांचा दिनक्रम आहे. 

दुष्काळामुळे गावाकडे पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. मैल अन मैल भटकंती करूनही प्यायला पाणी भेटत नाही. जनावरे दगू लागले आहेत माणसांची तीच परिस्थिति होईल अशी अवस्था झाल्याचे हे स्थलांतरीत मंडळी सांगताय. वरच्या पाण्यावर आलेल्या पिकाव्यतिरिक्त कुठलेही शेती उत्पादन यांना माहिती नाही. त्यामुळे गावाकडे रोजगाराची साधने उपलब्ध नसल्याने घरही रामभरोसे सोडत शहराकडे स्थलांतरित होऊ लागलेय. निवडणुका आल्या की मगच आमची आठवण येते.. नंतर आम्हाला कोणी विचारातही नाही. सरकारने आता तरी आमच्याकडे लक्ष द्यायला हवे..लाखो लोकांची हीच परिस्थिति आहे.. पाण्याची आणि रोजगार उपलंध करून द्या, अशी माफक अपेक्षा या आदिवासी शेतकर्‍यांनाकडून केली जातेय.

नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्‍वर, पेठ, हरसूल, या पाणीदार तालुक्यातील गावची गाव आणि वाड्याची वाड्या पाणी आणि रोजगाराच्या शोधात शहराकडे स्थलांतरित होत आहे.. एक दोन हजार नव्हे दीडलाखाहून अधिक लोक स्थलांतरित होत असल्याचे समोर येत आहे. मुंबईसह अर्ध्या महाराष्ट्राची तहान भागविणाऱ्या या तालुक्यातील स्थलांतरित लोकांच हे विदारक चित्र नाशिक जिल्ह्याच्या भीषण दुष्काळाच वास्तव सांगण्यासाठी पुरेस आहे.