सेल्फी घेताना दरीत पडली, दैव बलवत्तर म्हणून वाचले प्राण

सेल्फी घेण्याच्या नादात एक महिला थेट दरीत कोसळली.

Updated: Sep 24, 2019, 09:57 AM IST
सेल्फी घेताना दरीत पडली, दैव बलवत्तर म्हणून वाचले प्राण title=

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : थंड हवेचे ठिकाण असलेल्या सापुतारा येथे धक्कादायक घटना घडली आहे. सेल्फी घेण्याच्या नादात एक महिला थेट दरीत कोसळली. सुषमा मिलिंद पगारे असे या महिलेचे नाव आहे. धोक्याच्या ठिकाणी जाताना सेल्फीचा मोह आवरा अशा सुचना वारंवार केल्या जातात. पण याकडे दुर्लक्ष केल्याने जीवाशी बेतण्याचे प्रसंग येतात.

सेल्फी घेण्याच्या नादात सुषमा खोल दरीत पडली मात्र सुदैवाने वाचली.   सापुतारा तील सनराइज् पॉइंट येथे हा प्रकार घडला. नैसर्गिक सौंदर्याचे फोटो सेल्फीने आपल्या मोबाईलमध्ये टिपत असताना अचानक लक्ष विचलित झाल्याने पाय घसरून खोल खिंडीत पडली. मात्र दैव बल्लवतर म्हणून वाचली असून तिच्या कमरेला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. 

तिला नवागाव येथील तरुणांनी खोल दरीतून बाहेर काढत सापुतारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात केले. नाशिक येथील खाजगी रुग्णालयात तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.