नाशिक पालिकेचा अजब फतवा; बाजारात जाणार असाल तर हे वाचाच

नाशिकरांना आता बाजारात प्रवेश करण्यासाठी देखील पैसे मोजावे लागणार आहेत

Updated: Mar 30, 2021, 09:16 AM IST
नाशिक पालिकेचा अजब फतवा; बाजारात जाणार असाल तर हे वाचाच   title=

 नाशिक : आजवर बाजारात खरेदीसाठी पैसे लागतात हे माहिती होते मात्र नाशिकरांना आता बाजारात प्रवेश करण्यासाठी देखील पैसे मोजावे लागणार आहेत. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतांना पोलिसांनी कारवाईची धार तीव्र केली आहे. त्याचाच परिणाम म्हणजे आता बाजारात प्रवेशासाठी देखील पावती फाडावी लागणार आहे.
 
रविवारी रात्रीपासून पोलिसांनी नाकाबंदी, मास्क न घालता फिरणाऱ्यासह उघड्यावरील विक्री अशा विविध पातळ्यावर कारवाया सुरु केल्या आहेत. रविवारी रात्री शहरातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत विना मास्क फिरणाऱ्या सुमारे 363 जणांवर कारवाया केल्या. 
 
तर, आज जागोजागी बंदोबस्त लावतानाच महापालिकेच्या भाजीमार्केटात गर्दी टाळण्यासाठी एकच प्रवेशद्वारातून गर्दी नियंत्रणाचे उपाययोजना सुरु केले आहे. त्यामुळे नागरिकांकडून बाजारपेठांमध्ये होणाऱ्या नियमांचे उल्लंघन आणि गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी मनपाने अजब नियम काढला आहे. लोकांना यापुढे बाजारात जाण्यासाठी 5 रुपयेची पावती घ्यावी लागणार आहे.