तुम्ही राष्ट्रपती की पंतप्रधान? राणेंच्या प्रश्नाला नाशिक पोलीस आयुक्तांचं सविस्तर उत्तर

नारायण राणेंविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय

Updated: Aug 24, 2021, 12:12 PM IST
तुम्ही राष्ट्रपती की पंतप्रधान? राणेंच्या प्रश्नाला नाशिक पोलीस आयुक्तांचं सविस्तर उत्तर  title=

नाशिक : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आजच्या संपूर्ण राड्यावर पहिली प्रतिक्रिया दिली. यावेळी नारायण राणेंनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिल्यानंतर राणेंनी आपला मोर्चा नाशिक पोलीस आयुक्तांकडे वळवला. नाशिक पोलीस आयुक्त अटकेचे आदेश काढायला राष्ट्रपती आहे की पंतप्रधान अशी विचारणाही राणेंनी केली. यावर नाशिक पोलीस आयुक्तांनी दिलं उत्तर...

नाशिक पोलीस आयुक्त काय म्हणाले?

नारायण राणेंविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचं विधान गंभीर आहे. त्याविरोधात तक्रार आली. तक्रारदारांची भावना दुखावल्याचं नमूद आहे. त्यामुळे नारायण राणेंना अटक करण्यासाठी पथक रवाना झालं आहे. कायद्याप्रमाणे सर्व गोष्टी होतील. राणेंना अटक करुन न्यायालयात हजर केलं जाईल, न्यायालय जो आदेश देईल त्यानुसार पुढील कारवाई होईल, अशी माहिती नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिली आहे. 

राणे हे राज्यसभेचे सदस्य आहेत. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष आहेत. त्यांना अटकेनंतर माहिती दिली जाईल. संबंधित जिल्हा दंडाधिकारी, न्याय दंडाधिकारी त्यांना माहिती दिली जाईल. राष्ट्रपती आणि राज्यपाल या दोघांनाच संविधानात क्रिमिनल केसेसमध्ये अटकेची कारवाई करता येत नाही. बाकीच्यांना मुभा नाही. या केसमध्ये फॅक्ट ऑफ द केस पाहून ही कारवाई करण्यात येत आहे.

गुन्ह्याचं गांभीर्य पाहून माननीय साहेबांना पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून अटकेसाठी पथक रवाना झालं आहे. आदेश अटकेचे दिले आहेत. अटक करणे हा महत्त्वाचा भाग नाही, पुनरावृत्ती होऊ नये हे महत्त्वाचं आहे. राणेंनी आपलं निर्दोषत्व न्यायालयात सिद्ध करावं.