तीन मुलांची आई प्रियकराबरोबर फरार, पतीने उचललं टोकाचं पाऊल...

सीमा हैदर, अंजू आणि ज्योती मोर्या या तीन महिलांची नावं आतापर्यंत देशातील प्रत्येक माणसाला चांगलंच परिचीत झालंय. प्रियकरासाठी या महिलांनी पती आणि आपल्या मुलांनाही सोडलं. आता अशीच एक घटना नाशिकमध्ये समोर आली आहे. तीन मुलं आणि पतीला सोडून एक पत्नी प्रियकराबरोबर फरार झाली. 

Updated: Jul 25, 2023, 07:51 PM IST
तीन मुलांची आई प्रियकराबरोबर फरार, पतीने उचललं टोकाचं पाऊल... title=

सोनू भिडे, झी मिडिया, नाशिक :  पतीला सोडून प्रियकरासोबत (Boyfriend) पळून जाण्याच्या घटनांनी सध्या देशात खळबळ उडवली आहे. पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा हैदर (Seema Haider) असो की भारतातून पाकिस्तान नसरुल्लाहकडे गेलेली अंजू (Anju) असो. प्रियकरासाठी पतीला धोका देणाऱ्या ज्योती मोर्याची (Jyoti Mourya) कहाणी तर संपूर्ण देशभरात झालीय. आता नाशिकमध्येही अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पण या घटनेत पत्नीचा विरह सहन न झाल्याने पतीने आत्महत्या केली. नाशिकच्या (Nashik) यावल तालुक्यातील ही घटना आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?
 पत्नीने तीन मुले आणि पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेल्याने नैराश्यात गेलेल्या पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सतीश रमेश लोहार असे मृत व्यक्तीचं नाव आहे. या प्रकरणी वडिलांच्या फिर्यादीवरून पत्नी विरोधात आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतीश रमेश लोहार (३८, रा. सिडको) याच 2006 मध्ये जागृती विवाह झाला होता. विवाह नंतर त्यांना तीन आपत्य झाली. दोन मुली आणि एक मुलगा. सतीश नाशिकच्या एका खाजगी कंपनीत काम करून आपला प्रपंच चालवत होते. याच दरम्यान सतीशची पत्नी जागृती हिची परिचयातील एका तरुणाशी ओळख झाली आणि काही काळानंतर ह्या ओळखीचे रुपांतर प्रेमात झालं. दोघं चोरून एकमेकांना भेटायला लागले. मोबाईलवर लपून-छपून बोलणं होत होतं. 

सतीशने केली आत्महत्या
पत्नीचं प्रेम प्रकरण पती सतीश याला कळलं. यानंतर दोघांमध्ये भांडण होऊ लागले. याचा परिणाम मुलांवर होऊ लागला होता. सतीशने पत्नी जागृतीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने प्रियकराला सोडण्यास नकार दिला. घरातील भांडण वाढू लागल्याने पत्नी जागृती तीन मुलांना आणि पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेली. हे दुःख सतीशला सहन झाल नाही. या घटनेनंतर सतीश नैराश्यात गेला होता. यात त्याने 2 जुलैला सिडकोतील राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. 

वडिलांनी दिली फिर्याद 
सतीशचे वडील रमेश कडू लोहार यांनी सतीशची बायको जागृतीच्या अनैतिक संबधाला कंटाळून आत्महत्या केली असल्याचा आरोप केलाय.  यासंदर्भातली तक्रार अंबड पोलीस ठाण्यात दिली असून अंबड पोलीस ठाण्यात पत्नी विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नी आणि प्रियकर फरार असून पोलीस दोघांचा शोध घेत आहेत.