लाचखोरीच्या आरोपांतून वाघ, चिखलीकरांची निर्दोष मुक्तता

लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहाथ अटक केली होती.

Updated: Aug 26, 2019, 04:24 PM IST
लाचखोरीच्या आरोपांतून वाघ, चिखलीकरांची निर्दोष मुक्तता title=

नाशिक : नाशिक बांधकाम विभागातील वादग्रस्त अभियंता सतीश चिखलीकर आणि शाखा अभियंता जगदीश वाघ यांची लाचखोरीच्या आरोपांतून निर्दोष मुक्तता झाली आहे. नाशिक जिल्हा न्यायालयानं हा निकाल दिला आहे. २०१३ साली अभियंता चिखलीकर आणि शाखा अभियंता वाघ यांनी बिल मंजूर करण्यासाठी ठेकेदाराकडून २२ हजार रुपयांची लाच मागितली होती. ही लाच घेताना दोघांनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहाथ अटक केली होती. 

याप्रकरणी २ हजार पानांचं दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. तर २०१८ मध्ये सुनावणी दरम्यान फिर्यादच गहाळ झाल्याचं समोर आलं होतं. या लाचखोरीच्या आरोपातून आज दोघांचीही निर्दोष मुक्तता करण्यात आली.

चौकशी दरम्यान या चिखलीकडं करोडो रुपयांची मालमत्ता आढळून आल्यानं खळबळ उडाली होती.