मुंबई : Jan Ashirwad Yatra : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी आपला कोकण दौरा अचानक रद्द केला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या जनआशीर्वाद यात्रेत (Jan Ashirwad Yatra) सहभागी होण्यासाठी दरेकर रत्नागिरी, सिंधुदुर्ग दौरा करणार होते. पण अचानक हा दौरा रद्द करण्यात आला. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. दरेकर हे राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेत अग्रणीस्थानी होते. मात्र, त्यांना आपला दौरा का रद्द केला, याचीची चर्चा सुरु झाली आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची जनआशीर्वाद यात्रा (Jan Ashirwad Yatra) आजपासून पुन्हा सुरू होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर रंगलेल्या अटकनाट्य़ामुळे या जनआशीर्वाद यात्रेला ब्रेक लागला होता. आता आजपासून रत्नागिरीतून ही जनआशीर्वाद यात्रा सुरू होत आहे.
नारायण राणे आज मुंबईतून रवाना झालेत. त्यांच्यासोबत भाजप आमदार आशिष शेलार दौऱ्यात असणार आहेत. जनआशीर्वाद यात्रा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काढली जाईल. नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात विरोध होणार आहे. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही जिल्ह्यात कडक बंदोबस्त ठेवला आहे. दरम्यान भाजप नेते आशिष शेलार राणे यांच्या मुंबईतल्या घरी दाखल झालेत. त्यानंतर ते त्यांच्यासोबत कोकणात निघाले आहेत.