राणेंना मंत्रिमंडळात स्थान मिळणार, सेना सोबत नसली तरी जिंकू - दानवे

राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असून नारायण राणे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिलीय. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 18, 2018, 03:07 PM IST
राणेंना मंत्रिमंडळात स्थान मिळणार, सेना सोबत नसली तरी जिंकू - दानवे title=

अहमदनगर : राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असून नारायण राणे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिलीय. 

...शिवसेनेशिवाय निवडणूक जिंकणार

शिवसेनेने एकटे लढण्याची भूमिका जाहीर केलीय. त्यावर बोलताना शिवसेना आणि इतर मित्रपक्ष एकत्र निवडणुका लढवू मात्र नाही आले तर त्यांच्याशिवाय लढून जिंकू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

छिंदमवर कारवाई केली 

अहमदनगरमधील छिंदमवर कारवाई केली आहे. शिवाजी महाराजांचा अपमान कदापि सहन करणार नसल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितले. दानवे पुण्यातील बावधनध्ये भूमिपूजन कार्यक्रमासाठी आले होते.