उद्धव ठाकरेंनीकेलेल्या उल्लेखाबद्दल नारायण राणे बोलले असे काही...

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझा उल्लेख माझे पूर्वीचे सहकारी नारायणराव राणे असा केला त्यावेळी माझ्या मनात काय भावना आल्या ते शब्दांत सांगणं कठीण आहे त्यामुळे सांगण्याचा प्रयत्नही करणार नाही, अशा शब्दांत नारायण राणे यांनी पत्रकारांनी बोलताना भावना व्यक्त केल्या. 

Updated: Jun 23, 2017, 09:03 PM IST
उद्धव ठाकरेंनीकेलेल्या उल्लेखाबद्दल नारायण राणे बोलले असे काही... title=

कुडाळ : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझा उल्लेख माझे पूर्वीचे सहकारी नारायणराव राणे असा केला त्यावेळी माझ्या मनात काय भावना आल्या ते शब्दांत सांगणं कठीण आहे त्यामुळे सांगण्याचा प्रयत्नही करणार नाही, अशा शब्दांत नारायण राणे यांनी पत्रकारांनी बोलताना भावना व्यक्त केल्या. 

उद्धव ठाकरे यांनी जसा माझा आदरार्थी उल्लेख केला तसा मीही केला. ते पाहता कळतं की काही वेगळ्या भावना व्यक्त होतात. चांगले उदगार काढणं ही आपली संस्कृती आहे.  मी काही बाळासाहेबांचा तर नाहीच नाही पण उद्धवजींचाही एकेरी किंवा अपमानास्पद उल्लेख केला नाहीये, असेही नारायण राणे यांनी सांगितले.