नांदगावमध्ये मुस्लिम समाजाने घेतला 'असा' निर्णय, राज्यभरातून होतंय कौतुक

Nashik Muslim Community:आपल्या देशात सर्व जाती धर्माचे लोक राहतात. अशावेळी एकाच दिवशी दोन्ही धर्माचे सण येण्याचे प्रसंग अनेकदा समोर येतात. पण यातून आपण कसा मार्ग काढतो? यावर सलोखा टिकून असतो. 

Updated: Sep 6, 2023, 09:54 AM IST
नांदगावमध्ये मुस्लिम समाजाने घेतला 'असा' निर्णय, राज्यभरातून होतंय कौतुक title=

निलेश वाघ, झी मीडिया, मनमाड:  आपल्या देशात सर्व जाती धर्माचे लोक राहतात. अशावेळी एकाच दिवशी दोन्ही धर्माचे सण येण्याचे प्रसंग अनेकदा समोर येतात. पण यातून आपण कसा मार्ग काढतो? यावर सलोखा टिकून असतो. असाच एक सामंजस्याचा प्रकार नांदगावमधून समोर आला आहे. इथल्या मुस्लिम बांधवांनी घेतलेल्या एका निर्णयाचे राज्यभरातून कौतुक होत आहे. 

यंदा गणेश विसर्जन आणि प्रेषित हजरत महम्मद पैगंबर यांची जयंती म्हणजेच ईद-ए-मिलाद नबी जुलुस हे दोन सण एकाच दिवशी साजरे होणार आहेत. साहजिकच यामुळे पोलिसांवरील ताण वाढणार आहे. दरम्यान दोन्ही कार्यक्रम सौहार्द पूर्ण साजरे व्हावे , हिंदू - मुस्लिम सामाजिक सलोखा कायम रहावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
यासंदर्भात पोलीस स्थानकात महत्वाची बैठक घेण्यात आली. 

या बैठकीत नाशिकच्या नांदगाव येथील मुस्लिम समाज बांधवांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला.त्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार ईद-ए-मिलाद नबी जुलुस दुसऱ्या दिवशी काढण्यात येणार आहे.पोलीस स्थानकात झालेल्या मुस्लिम बांधवांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांना यासंदर्भातील पत्र देण्यात आले आहे.मुस्लिम बांधवांनी घेतलेल्या निर्णयाचे हिंदू बांधवांकडूनही स्वागत केले जात आहे. 

कुटुंबासोबत त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी निघाला पण चालत्या एसटीमध्येच...पुण्यात मन हेलावणारी घटना

शिर्डी लोकसभा मतदारसंघावरून खडाजंगी

शिर्डी लोकसभा मतदारसंघावरून मातोश्रीवर खडाजंगी झालीय. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे विरुद्ध माजी मंत्री बबनराव घोलप यांच्यात जुंपण्याची शक्यता आहे. भाऊसाहेब वाकचौरे यांनी ठाकरेंच्या सेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांना उद्धव ठाकरेंच्या गटातून शिर्डी लोकसभेसाठी उमेदवारी घोषित करण्यात आली. मात्र त्यावरून माजी मंत्री बबनराव घोलप नाराज आहेत. त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेत नाराजी जाहीर केलीय. सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी पाच वेळा आमदार राहिलेल्या बबनराव घोलप यांना लोकसभेच्या उमेदवारीचं आश्वासन दिलं होतं. 

लोकलमधून पडून युवकाचा मृत्यू, 13 वर्षांनंतर मुंबई हायकोर्टने दिला 'हा' आदेश