नांदेड : घरासमोर कचरा टाकल्याच्या कारणावरून 2 सख्या भावांचा खूण करण्यात आल्याची धक्कादायक घटना नांदेड शहरात घडली आहे. नांदेड शहरातील देगाव चाळ भागात हा थरार आज सकाळी घडला.
क्षुल्लक वादाचं पर्यावसन हत्येत
घरासमोर कचरा टाकण्याच्या कारणावरून भावकिमध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झालं. हा वाद इतका टोकाला गेला की आरोपींनी दोन्ही भावांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. 35 वर्षीय प्रफुल्ल राजभोज आणि 33 वर्षीय संतोष राजभोज या दोघा भावांवर आरोपींनी चाकूने गंभीर वार केले. यात प्रफुल्ल आणि संतोष दोघांचाही मृत्यू झाला. घटनेत अन्य दोघे गंभीर जखमी झाले.
7 आरोपींवर खुनाचा गुन्हा
घरासमोर कचरा टाकण्यावरुन भाविकतल्या काही लोकांमध्ये वाद होता. याज सकाळी यात ठिणगी पडली आणि जोरदार भांडण झालं. भांडणात दोन्ही भावांवर हल्ला करण्यात आला. या प्रकरणी 7 आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
याप्रकरणाने परिसरात भीतीचं वातावरण असून पोलीस अधिक तपास करत आहेत.