संपूर्ण नांदेड शहर काळोखात, ६ कोंटीची थकबाकी

संपूर्ण नांदेड शहर काळोखात आहे. थकबाकीपोटी महावितरणने सर्व पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित केलाय.

Surendra Gangan Updated: Mar 14, 2018, 11:46 PM IST
संपूर्ण नांदेड शहर काळोखात, ६ कोंटीची थकबाकी title=

नांदेड : संपूर्ण नांदेड शहर काळोखात आहे. थकबाकीपोटी महावितरणने सर्व पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित केलाय.

 ६ कोटी रुपयांच्या थकबाकी बिलापोटी हा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आलाय. त्यामुळे संपूर्ण नांदेड शहर काळोखात आहे. थकबाकीपोटी महावितरणने शहरातील सर्व पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित केल्याने सगळीकडे अंधार आहे.

महावितरणने नांदेड महापालिकेला थकीत बिल बिलापोटी विद्युत पुरवठा बंद करण्यात येईल, असे कळविले होते. तरीही महापालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आज महावितरणने कारवाई करताना शहराचा विद्युतपुरवठा खंडित केला.